काँग्रेसमध्ये (Congress) मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास 10 नेते इच्छुक आहेत. त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षापुढे विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढवल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजवणारा उपरोक्त दावा केला आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कमीत कमी 10 जण शर्यतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे विधानसभेच्या 288 जागा लढवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या प्रकरणी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.
(हेही वाचा हिंदुद्वेषी Maharaj Filmला जगभरात प्रसिद्धी मिळण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ने घेतली इस्लामी देशांची मदत)
काँग्रेसला पक्ष एकटा पडण्याची भीती
काँग्रेसच्या (Congress) मनात शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट धोका देण्याची भीती आहे. काँग्रेसची सध्याची वाटचाल पाहता हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपला पक्ष एकटा पडू नये असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे काँग्रेसचे राज्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे, असेही अनिल पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
काँग्रेसच्या परिपत्रकामुळे चर्चेला पेव
काँग्रेसने (Congress) एका परिपत्रकाद्वारे आजपासून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज मागवलेत. हे अर्ज पक्षाने राज्यातील 288 जागांवरून मागवलेत. यासाठी इच्छुकांना पक्षनिधी म्हणून 20 हजार रुपयांची मागणी केली आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला उमेदवारांसाठी हा निधी 10 हजार रुपयांचा आहे. या परिपत्रकामुळे काँग्रेस विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पण काँग्रेसने हा दावा फेटाळला आहे.
Join Our WhatsApp Community