- खास प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला किमान २९ जागा मिळू शकल्या नसल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी एकही पक्ष पात्र नाही. तरीही शिवसेना उबाठा आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांमध्ये विरोधी पक्ष नेते पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उबाठाचे २० तर काँग्रेसचे १६ आमदार असले तरी उबाठाकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद असल्याने विधानसभेत काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे.
जनतेला गृहीत धरल्याने तोंडघशी
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. ४८ पैकी ३२ उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले. मात्र सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने लोकसभेचा निकाल जसाच्या तसा लागेल असे गृहीत धरल्याने तोंडघशी पडले.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी सर्वाधिक मागणी)
महायुतीला प्रचंड यश
‘मविआ’च्या वाट्याला २८८ विधानसभा जागांपैकी ५० जागाही आल्या नाहीत. शिवसेना उबाठाचे २०, काँग्रेसचे (Congress) १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर समाधान मानावे लागले. तर महायुतीला प्रचंड यश मिळाले. भाजपाच्या १३२, शिवसेना (शिंदे) ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार निवडून आले.
‘मविआ’वर इतकी वाईट परिस्थिती
विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाला विधानसभेच्या एकूण जागांपैकी म्हणजेच २८८ पैकी किमान १० टक्के जागा (२९) निवडून येणे आवश्यक आहे. पण महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला २९ उमेदवार (१० टक्के) निवडून आणता आले नाही, इतकी वाईट परिस्थिती ‘मविआ’वर आली. आता शिवसेना उबाठाची आमदार संख्या (२०) काँग्रेसपेक्षा (१६) तुलनेने अधिक असल्याने विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी दावा केला असून काँग्रेसनेही (Congress) विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे मंगळवारी २१ जानेवारी २०२५ या दिवशी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community