काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळी पराभव केला. त्यांच्यावर अन्याय केला, त्यामुळे काँग्रेसने खरे तर माफी मागायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली.
काँग्रेसला फक्त बाबासाहेबांचे नाव वापरायचे आणि त्यांचे नाव वापरून राजकारण करायचे आहे. मात्र, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कधीही कुठलाही सन्मान दिलेला नाही, बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देखील काँग्रेसने दिलेला नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केला.
(हेही वाचा …तर महाराष्ट्राचा बांगलादेश होईल; म्हणून मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाका; Ranjit Savarkar यांचे आवाहन)
भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना आणि संविधानातील आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे. हे सर्व पुराव्यांसहित मोदींनी जगासमोर आणले. त्यामुळे काँग्रेस पार्टी आता अशा प्रकारे नाटक करायचे काम करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याच काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक पाडले. एवढेच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी परिनिर्वाण झाले, त्या इंदुमीलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली. पण सुईच्या टोकाइतकी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 दिवसांमध्ये 2 हजार कोटी रुपयांची जमीन राज्य सरकारला दिली, असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे, असे ते (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community