काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले; J P Nadda यांचा घणाघात

48

मुस्लीम देशांमध्ये वक्फबाबत केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, तुर्कीमधील संपूर्ण वक्फ मालमत्ता 1924 मध्येच सरकारी नियंत्रणाखाली घेण्यात आली होती. 70 वर्षात कसा विकास झाला ते संपूर्ण देशाने पाहिले. काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जेचा नागरिक बनवले. आमचा प्रयत्न फक्त नियमांच्या कक्षेत आणण्याचा आहे. 2013 च्या दुरुस्तीला आमचा पाठिंबा होता पण त्याचा दुरुपयोग झाला. सुधारणा आणून वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे, असे मत भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी मांडले.

केंद्रातील मोदी सरकारने आणलेले बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 काही सुधारणांसह लोकसभेने मंजूर झाले आहे. लोकसभेत मॅरेथॉन चर्चेनंतर विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेनंतर राज्यसभेत विधेयक मांडले. यावेळी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी वक्फच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. दिल्लीतील 123 सरकारी मालमत्ता वक्फ घोषित करण्यात आल्या, कर्नाटकातही तलाव, मंदिरे, शेतजमीन आणि सरकारी जमीन वक्फ घोषित करण्यात आली. या कायद्यात अनेक चुका होत्या, त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस पक्षानेही यात साथ द्यायला हवी. भूमाफियांनी भरपूर मलई खाल्ली आहे. काँग्रेस पक्ष फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहील, अशी अपेक्षा आहे. मात्र, ते अवघड आहे, असा टोला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांनी (J P Nadda) लगावला.

(हेही वाचा Waqf Amendment Bill 2025 अपूर्ण; सरकारने हिंदू समाजावर झालेला अन्याय दूर करावा; हिंदु जनजागृती समितीची मागणी)

मला धर्माशी संबंधित विषयात फार खोलात जायचे नाही. देणगी देणारी व्यक्ती प्रामाणिक असली पाहिजे. पण, वक्फ बोर्ड कागदपत्रांशिवाय कोणत्याही मालमत्तेवर दावा करत असे. तामिळनाडूतील एका गावच वक्फची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले. वक्फ मालमत्तेची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. वक्फ मालमत्तेतील अनियमिततेची जबाबदारी निश्चित करावी लागेल. मुस्लिमांना 70 वर्षे कोणी घाबरवले, काँग्रेसने 70 वर्षे हाच प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच तुम्ही विरोधी बाकावर बसला आहात, अशी टीकाही नड्डांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने फार पूर्वीच तिहेरी तलाक रद्द करण्याची शिफारस केली होती. पण, तुम्ही मुस्लिम महिलांना कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. यावेळी जेपी नड्डांनी इराक आणि सीरियासह मुस्लिम देशांची उदाहरणे दिली, जिथे तिहेरी तलाक फार पूर्वीच रद्द करण्यात आला आहे. भारतात हे संपवून मुस्लिम भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. काँग्रेसने मुस्लिम भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखले, असेही नड्डा (J P Nadda) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.