काँग्रेसकडे ना व्हिजन ना बोलण्यात वजन; पंतप्रधानांचा घणाघात

141

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चुकून मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचला, त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच खिल्ली उडवत, ‘काँग्रेसकडे कोणतेही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही, असे म्हणत राजस्थानला आता अशा अस्थिर सरकार आणि अनिश्चिततेपासून मुक्तीची गरज आहे. तरच राजस्थानमध्ये कायद्याचे राज्य स्थापित होईल आणि ते वेगाने विकासाच्या मार्गावर चालू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दौसा येथील धनावद येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या एका टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेला पंतप्रधानांनी संबोधित केले. काँग्रेससाठी अर्थसंकल्प आणि घोषणा कागदावर लिहिण्यासाठी असतात. जमिनीवर योजना आणि कार्यक्रम राबविण्याचा काँग्रेसचा विचार नाही. त्यांनी काय वाचले हा प्रश्न नाही, प्रश्न हा आहे की यापूर्वीचा वाचला…वर्षभर तो डब्ब्यात बंद करून ठेवला होता. यामुळेच ते झाले. राजस्थानात डबल इंजिन सरकार पाहायला उत्साह दिसून येत आहे. चहुबाजूंना मला हे दिसत आहे. दौसामध्ये उत्साह दिसून येतो आहे. गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी डबल इंजिनची पॉवर लागली असती तर इथला विकास किती जलद झाला असता. काँग्रेस आपणही काम करत नाही आणि करुही देत नाही, असा आरोपही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा हिंदूंनो, मुसलमानांचे आर्थिक आक्रमण ओळखा आणि रस्त्यावरचे व्यवसाय ताब्यात घ्या; रणजित सावरकर यांचे आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.