…तर त्यांची काँग्रेसी विचारधारा जळून खाक होईल; VHP कडून Rahul Gandhi यांचा निषेध

हिंदू समाजाने आपला तिसरा नेत्र उघडला तर Rahul Gandhi यांची काँग्रेसी विचारधारा त्या क्रोधाच्या अग्नीत जळून खाक झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा VHP ने दिला आहे.

128
...तर त्यांची काँग्रेसी विचारधारा जळून खाक होईल; VHP कडून Rahul Gandhi यांचा निषेध
...तर त्यांची काँग्रेसी विचारधारा जळून खाक होईल; VHP कडून Rahul Gandhi यांचा निषेध

रायबरेलीचे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या अधिवेशनात बोलताना हिंदू समाजाला हिंसक म्हणून संबोधल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – मीडियामध्ये अनावश्यक वक्तव्ये टाळा; PM Narendra Modi यांचा रालोआ खासदारांना गुरूमंत्र)

तमाम हिंदु धर्मियांच्या भावनांवर आघात

ते पुढे म्हणाले, यापूर्वीही राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू आतंकवादाचे नॅरेटीव्ह निर्माण करणारी पिलावळ यांच्याच कुळातील होती.

राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने तमाम हिंदु धर्मियांच्या भावनांवर आघात केला आहे, तसेच त्यांच्या अशा प्रकारच्या बोलण्यातून हिंदु धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याची विकृत मानसिकताच प्रकट होते. विरोधी पक्षनेते झाल्यावर तरी ते जबाबदारीने वागतील, बोलतील अशी अपेक्षा असणाऱ्यांची त्यांनी घोर निराशा केली आहे.

ज्या राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकरांचा फोटो दाखवत “अभय” शब्दाचा उल्लेख केला, त्या राहुल 6 गांधीनी हेही लक्षात ठेवावे भगवान शंकराला तिसरा नेत्र आहे आणि तो उघडला तर सर्व काही भस्मसात होते. हिंदु धर्माला वारंवार अपमानित करणाऱ्यांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, हिंदू समाजाने आपला तिसरा नेत्र उघडला तर राहुल गांधींची काँग्रेसी विचारधारा त्या क्रोधाच्या अग्नीत जळून खाक झाल्याशिवाय रहाणार नाही.

संसद सभागृहात विरोधी पक्षनेता या नात्याने बोलताना त्यांनी केवळ हिंदूंचा अपमान केला नाही, तर घटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचीही पायमल्ली केली आहे. म्हणून लोकसभेच्या माननीय अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करून संसदेच्या आणि घटनेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे, अशी आग्रही मागणी मोहन सालेकर (Mohan Salekar) यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.