काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना केली; Eknath Shinde यांनी विधान परिषदेत दिले लेखी दाखले

60
काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना केली; Eknath Shinde यांनी विधान परिषदेत दिले लेखी दाखले
काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना केली; Eknath Shinde यांनी विधान परिषदेत दिले लेखी दाखले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ती जागा तत्कालिन काँग्रेस सरकारने दिली नाही. अखेर दादर चौपाटीजवळील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे स्मारक उभे राहिले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना सातत्याने अपमानित केलेच पण मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले. (Eknath Shinde)

याबाबतची वस्तुस्थिती मांडताना, महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. योगिराज बागुल यांनी त्यांच्या ‘आठवणीतले बाबासाहेब’ या ग्रंथामध्ये ही बाब नमूद केली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना, शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या ७ जुलै १९३४ रोजीच्या अंकामध्ये काँग्रेस ही भांडवलदार आणि जमीनदारांची संस्था असल्याचा उल्लेख असल्याचे दाखवून दिले. (Eknath Shinde)

(हेही वाचा- Taj Mahal भेटीपेक्षा ‘या’ वारीला भारतीयांची जास्त पसंती )

ती येनकेन प्रकारे त्यांचे हितसंबंध आणि त्यांची हुकूमत टिकवून ठेवण्यासाठी काम करणारी संस्था आहे, असे मत बाबासाहेबांनीच या पुस्तकात व्यक्त केले असल्याचे दाखवून दिले. महायुती सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दलचे प्रेम अन्य कुणी शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. (Eknath Shinde)

काँग्रेसचे दलित बांधवांविषयी कायमच दुटप्पीपणाचे धोरण राहिले आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच काँग्रेस हे जळते घर आहे त्यापासून दूर राहा, असे सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेसने सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. दोन वेळा कटकारस्थान करून काँग्रेसनेच बाबासाहेबांना निवडणुकीत हरवलं होते. (Eknath Shinde)

(हेही वाचा- Mumbai Boat Accident : अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी परवाना अखेर रद्द)

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असूनही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे तपासली मग काँग्रेसने बाबासाहेबांना कसे अपमानित केले ते आपल्या लक्षात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.