Congress : बिहारमध्ये काँग्रेसच्या हातात धुपाटणे; डाव्या पक्षाचा आठ जागांवर दावा

इंडी आघाडी बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहत असलेल्या काँग्रेस पक्षाची बिहारमध्ये केविलवाणी अवस्था होण्याच्या मार्गावर आहे. कारण, भारतीय काम्युनिस्ट पक्ष आणि माले या दोन्ही पक्षांनी आठ जागावर दावा केला आहे.

209
Ayodhya Ram Mandir : पक्षाचा आदेश धुडकावत काँग्रेस नेत्याने थेट गाठली अयोध्या
Ayodhya Ram Mandir : पक्षाचा आदेश धुडकावत काँग्रेस नेत्याने थेट गाठली अयोध्या

इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहत असलेल्या काँग्रेस पक्षाची (Congress) बिहारमध्ये केविलवाणी अवस्था होण्याच्या मार्गावर आहे. कारण, भारतीय काम्युनिस्ट पक्ष आणि माले या दोन्ही पक्षांनी आठ जागावर दावा केला आहे. अशात, काँग्रेसच्या झोळीत काय पडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव आणि १७-१७ जागा आपसात वाटून घेतल्यानंतर सहा जागा काँग्रेस आणि डाव्या पक्षासाठी सोडल्या होत्या. (Congress)

मात्र, भाकपा आणि माले या दोन्ही पक्षांनी आठ जागावर दावा केला आहे. सहा जागा असताना आठ जागांवर दावा केल्यामुळे काँग्रेसच्या (Congress) झोळीत नेमके काय पडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच एकला चलोची भूमिका घेतली आहे, हे विशेष. (Congress)

(हेही वाचा – Mirabai Chanu to Train In the USA : मीराबाई चानूच्या अमेरिकेत सरावाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता)

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जेडीयू, राजद आणि डाव्या पक्षाच्या नेत्यामध्ये बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. पण यात काँग्रेस (Congress) कुठेही दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वी नितीशकुमार आणि डी राजा यांची भेट झाली होती. महाआघाडीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा आणि प्रदेश सचिव रामनरेश पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांची भेट घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (Congress)

बुधवारी रामनरेश पांडे यांनी बेगुसराय, मधुबनी आणि बांका लोकसभा जागांवर केवळ एकतर्फी दावा केला नाही तर घोषणा सुद्धा केली. त्याच वेळी, सीपीआय (एमएल) च्या टीमने बुधवारी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांचीही भेट घेतली आणि पाच जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केला. डाव्या पक्षांनी ज्या जागावर दावा केला आहे त्यात अराह, सिवान, जेहानाबाद, करकट आणि कटिहार यांचा समावेश आहे. (Congress)

(हेही वाचा – HC on Maratha Aandolan : हे आमचे काम नाही; मराठा आंदोलनाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)

एमएलच्या बाजूने पॉलिटब्युरो सदस्य धीरेंद्र झा, राजाराम सिंह आणि केडी यादव यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्याचवेळी माकपने उजियारपूर, महाराजगंज आणि खगरिया या जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) पक्ष काँग्रेसला (Congress) बिहारमध्ये किंचितही महत्व देत नाही असे दिसून येत आहे. दुसरीकडे, काँग्रेसने सर्वाधिक जागा स्वतःच्या ताब्यात घेत इतरांना कमी जागांवर निवडणूक लढवा, असा सल्ला दिल्याची माहिती असून त्यामुळेच ‘इंडी’ आघाडीत (I.N.D.I. Alliance) बिघाडीची दाट शक्यता आता वाढली आहे. काँग्रेस ‘बिग ब्रदर’च्या भूमिकेत असून त्याचा फटका इतर राजकीय पक्षांना निश्चित बसेल. (Congress)

इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) मतभेद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. अंतिम जागांबाबत घेतलेल्या निर्णयाला अंतिम मान्यता देण्यासाठी १४ किंवा १५ जानेवारीला दिल्ली येथे बैठक होणार आहे. सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहे. बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा होणार आहे. याबरोबरच ‘वंचित’ला ‘मविआ’मध्ये किती जागा द्यायच्या यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.