विदर्भातील काँग्रेसअंतर्गत वाद आज चव्हाट्यावर आला. नवनिर्वाचित काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता लोकसभा तिकीट कापण्याचा तसेच लोकसभा निवडणुकीत आपला पराभव करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रयत्न केल्याचा जाहीर आरोप केला. (Congress Internal Conflict)
पक्षश्रेष्ठींकडून तिकीट मिळवले
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या कन्येला लोकसभा तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे सर्वश्रूत आहेच. त्यानंतर धानोरकर यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विजयाची खात्री देत तिकीट मिळवले. तेव्हापासून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहे. (Congress Internal Conflict)
(हेही वाचा – Rain Forecast : पुढील २४ तासांसाठी कसा आहे पावसाचा अंदाज)
पराभवासाठी सुपारी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. अनेक दिवस सुरू असलेली अंतर्गत धुसपूस आता चव्हाट्यावर आली. चंद्रपूरात एका जाहीर सभेत बोलताना सांगितले की, आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी आपल्या पक्षातील लोकांनी प्रयत्न केले. तसेच आमदार सुभाष धोटे यांना आपल्या पराभवासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप धानोरकर यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता केला. (Congress Internal Conflict)
त्या पुढे म्हणाल्या की सुभाष धोटे यांनी मात्र वडेट्टीवार यांना साथ न देता आपली बाजू घेतली आणि सहकार्य केले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हा आरोप फेटाळून लावला. मात्र, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील शीतयुद्ध लपून राहिले नाही. (Congress Internal Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community