भाजपाचा तिरंगा आणि कॉंग्रेसचा तिरंगा वेगळा आहे का?

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आपला डीपी म्हणून तिरंगा ठेवण्याचं आवाहन केलं आहे. हे आवाहन बहुसंख्य जनतेने स्वीकारलेलं आहे. आपला भारत तिरंगामय झाला आहे. आता १५ ऑगस्टला हर घर तिरंगा ही मोहीम देखील यशस्वी होणार आहे. पण त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. राहुल गांधी यांनी नेहरुंनी तिरंगा घेतलेला फोटो ट्विट करत ’देश की शान है, हमारा तिरंगा, हर हिंदुस्तानी के दिल में है, हमारा तिरंगा.” असं कॅप्शन दिलं आहे. “हम हाथ में तिरंगा लिए अपने नेता नेहरू की DP लगा रहे हैं। लेकिन लगता है प्रधानमंत्री का संदेश उनके परिवार तक ही नहीं पहुंचा। जिन्होंने ५२ सालों तक नागपुर में अपने हेड क्वार्टर में झंडा नहीं फहराया, वे क्या प्रधानमंत्री की बात मानेंगे?” असं ट्विट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन सक्तीचे नाही

पहिली गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे, ते बळजबरीचे नाही. ज्यांना आपला डीपी बदलायचा नाही, तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे आणि संघ तिरंग्याचा सन्मान करत नाही, ही गोष्ट चुकीची आहे. नरेंद्र मोदी संघ परिवारातून आले आहेत. आज त्यांच्यामुळेच ही एवढी मोठी मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तिरंगा दिसला पाहिजे असं आवाहन केलेलं आहे.

कॉंग्रेसचा गैरसमज 

मोदींनी महात्मा गांधींना स्वच्छता अभियानाचं प्रतीक बनवलं. सगळीकडे महात्मा गांधी यांचे फोटो झळकले. त्यावेळी कॉंग्रेसला वाटलं की, महात्मा गांधी तर आमचे आहेत आणि आज मोदी त्यांचा वापर करत आहेत. मोदींनी आमच्याकडून गांधी चोरले असा समज कॉंग्रेसींनी करुन घेतला. म्हणजे महात्मा गांधी केवळ कॉंग्रेसचे आहेत, देशाचे नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना कै. बाळासाहेब ठाकरे हे केवळ ठाकरे कुटुंबाचे वाटतात, त्याप्रमाणे कॉंग्रेसलाही गोड गैरसमज झालेला आहे की गांधी हे त्यांचे आहेत आणि तिरंगा हा त्यांचाच आहे.

(हेही वाचा धार्मिक पक्षपात करणाऱ्या MPCB च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, हिंदु जनजागृती समितीची मागणी)

म्हणून कॉंग्रेसला खटकतंय

नरेंद्र मोदींनी तिरंग्याची मोहीम राबवली आणि जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला हेच कॉंग्रेसला खटकतंय. इतक्या वर्षात हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरोधात लढवत असताना आणि पराकोटीचा भ्रष्टाचार करत असताना बिचार्‍या कॉंग्रेसला अशी चांगली मोहीम राबवली जाऊ शकते, हेच सुचलं नसावं. मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक केलं, तेव्हाही कॉंग्रेसला खूप दुःख झालं. ते झोपेतून जागे झाले आणि अशा प्रकारे पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात याचा साक्षात्कार त्यांना झाला. पण हे सत्कृत्य मोदींनी केल्यामुळे त्यांना त्रासही झाला.

कॉंग्रेसला राजकारण करायचंय

आज देशात एकात्मतेची जाणीव होत असताना यात कॉंग्रेसला राजकारण करायचं आहे. कारण कॉंग्रेसला देश एकसंध ठेवता आला नाही. ज्या नेहरुंना काश्मीरचा प्रश्न कधी समजलाच नाही, त्यांचा तिरंग्यासह डीपी ठेवून लोक मूर्ख बनतील असा गैरसमज राहुल गांधींना झालेला दिसतोय. गांधी परिवाराची विश्वासार्हता संपलेली आहे आणि कॉंग्रेसी लोकांनी आपला पक्ष एका कुटुंबाच्या चरणांवर अर्पण केला असल्यामुळे कॉंग्रेसची विश्वासार्हता देखील संपलेली आहे. कॉंग्रेसने कितीही विरोध केला तरी आज भारतीयांची एकजूट झालेली आहे. ही एकजूट कॉंग्रेसला नकोय, कारण डीव्हाईड ऍंड रुल ही इंग्रजांची शिकवण त्यांनी आत्मसात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here