Congress : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात, मतदान काँग्रेस किंवा डाव्यांना करू नका तर भाजपाला करा

214
पश्चिम बंगालमध्ये भाजपा तेथील ममता बॅनर्जी यांच्या टीएम सी पक्षाला मोठ्या ताकदीनिशी लोकसभेत विरोध करत आहे. या ठिकाणी भाजपाचा बोलबाला सुरू झाला आहे. त्यातच आता काँग्रेसच्या (Congress) पश्चिम बंगालमधील अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. चौधरी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावे चर्चेला उधाण आला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अशी चर्चा आहे की पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आणि बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, काँग्रेस आणि डाव्यांसाठी निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी निवडणुका जिंकल्या नाहीत तर भारताच्या धर्मनिरपेक्षतेला फटका बसेल. लोकसभेच्या जागेसाठी डाव्या-काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुर्तुझा हुसैन यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूलला मत देण्यापेक्षा भाजपला मतदान करणे चांगले असल्याचे म्हटले.

काँग्रेस भाजपाच्या विरोधात – जयराम रमेश

2019 मध्ये भाजपाने जिंकलेल्या जागांची संख्या कमी करणे हे काँग्रेस (Congress) पक्षाचे एकमेव ध्येय आहे हे येथे स्पष्ट करणे त्यांना आवश्यक वाटते, असे जयराम रमेश म्हणाले. ही विधानसभा निवडणूक नसून लोकसभेची निवडणूक असल्याचे ते म्हणाले. येथे डावे पक्ष आणि काँग्रेस यांची युती आहे. आम्ही टीएमसीसोबत जागावाटप करू शकत नसलो तरी ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष इंडी आघाडीचा घटक आहे, असेही ते म्हणाले.

टीएमसी आणि काँग्रेसमध्ये कोणताही करार नाही

पश्चिम बंगालमध्ये, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत, जरी काँग्रेसची (Congress) डाव्या पक्षांशी युती आहे आणि काँग्रेसने डाव्यांसाठी 12 जागा सोडल्या आहेत. या 12 जागांवर काँग्रेसने उमेदवार दिलेले नाहीत. राज्यातील सर्व 42 जागांवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, भाजप आणि डावे पक्ष एकमेकांना मदत करत असल्याचा आरोप करत आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील कलह वाढला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.