अदानीवरून काँग्रेसची शरद पवारांवर टीका; उप मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

107
चित्ता(Cheetah)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेत अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी देशातील बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरही आपले परखड मत मांडले. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्याने त्यांच्या विरोधात ट्विट केले आहे. ‘डरे हुए – लालची लोग ही आज अपने निजी हितों के चलते तानाशाह सत्ता के गुण गा रहे हैं’, असा हल्ला पवार यांच्यांवर केला आहे. .यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने त्यांच्या सहकारी पक्षावर अशी टीका करणे चुकीचे आहे. काँग्रेस महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती बिघडवत आहे, असे फडणवीस म्हणाले.

अदानी प्रकरणातील जेपीसी चौकशीचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीची गरज नसल्याचे म्हटले होते. कारण जेपीसीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल तर सत्य कसे बाहेर येईल, असे पवार म्हणाले. त्याचवेळी उद्योगपतींना राजकारणासाठी लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते.

(हेही वाचा cm eknath shinde ayodhya visit : राज्य सुजलाम सुफलाम होण्याचे श्रीरामाला साकडे घातले – मुख्यमंत्री शिंदे)

काँग्रेसचे ट्विट

काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता अलका लांबा यांनी ट्विटरवर शरद पवार आणि गौतम अदानी यांचा फोटो शेअर केला आहे. अन् लिहिले आहे की, ‘आज घाबरलेले लोभी लोक वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान करत आहेत. एकच राहुल गांधी देशातील जनतेची लढाई लढत आहे. ही लढाई भांडवलदार चोरांविरुद्ध तसेच चोरांना वाचवणाऱ्या चौकीदाराविरुद्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.