भारत जोडो यात्रेत धक्काबुक्की; चेंगराचेंगरीत दिग्विजय सिंह कोसळले जमिनीवर

110

मध्य प्रदेशात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज मध्य प्रदेशातील पदयात्रेचा चौथा दिवस आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आज, शनिवारी ओंकारेश्वर ते इंदूरकडे निघाली आहे. यानंतर राहुल गांधी आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार असून, त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेणार आहेत.

या यात्रेदरम्यान चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह खाली जमिनीवर कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या समर्थकांनी त्यांना आधार देत सावरले. चेंगराचेंगरीत खाली कोसळलेल्या दिग्विजय सिंह यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांची तब्येत बरी असून या भारत जोडो यात्रेदरम्यान ते पुढील प्रवासाला जात आहेत.

(हेही वाचा – … म्हणून आम्ही कामख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातोय, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले)

काय घडला प्रकार

दिग्विजय सिंह हे राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना बरवाहपासून चार किमी अंतरावर चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहासाठी थांबले. त्यावेळी तिथे चेंगरा-चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले. या प्रकरणानंतर दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.