महाकुंभाची (Mahakumbh) व्यवस्था खूप घाण आहे, त्यामुळे रोगराई पसरते, असे म्हणत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी महाकुंभाला घाणेरडे संबोधित केले आहे.
१२ वर्षांतून एकदा आयोजित होणाऱ्या या महाकुंभामुळे (Mahakumbh) आजार वाढतात. महाकुंभमेळ्यादरम्यान बरेच लोक गंगा नदीत स्नान करतात. मला वाटते तिथे खूप घाण असेल. तिथे लोक ज्या पद्धतीने राहत आहेत, त्यामुळे आजार पसरतील. मी दोनदा हजला गेलो होतो. तिथे जी काही व्यवस्था केली जाते, तीच व्यवस्था येथेही केली पाहिजे.
(हेही वाचा Republic Day 2025 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये जेष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे हस्ते ध्वजारोहण)
जगभरातून लोक हजकडे येतात. लाखो लोक येतात. अजिबात काही अडचण येत नाही. जर तुम्हाला कुंभमेळा (Mahakumbh) आयोजित करायचा असेल तर तो तसाच करा. मी उमराहला गेलो होतो, हजला गेलो होतो. त्यानुसार व्यवस्था करा. इथे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त लोक आहेत, त्यांची तपासणी करा. जर एखादा रोगी निरोगी लोकांसोबत आंघोळ करत असेल तर त्यालाही रोग होईल. जर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आंघोळ करतील तर ते कसे चालेल?, असे हुसेन दलवाई म्हणाले.
Join Our WhatsApp Community