सावरकरांच्या विषयावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची भूमिका वेगळी आहे. म्हणून आम्ही त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असे म्हणणार नाही आणि आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. राहुल गांधींनी काय बोलावे याबाबत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला काही सांगू नये, असा दम काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे माणिकराव ठाकरे जोरदार चर्चेत आले आहेत.
काय म्हणाले माणिकराव ठाकरे?
आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटले नव्हते, आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. राहुल गांधींनी सावरकरांविषयी लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विचार वीर सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशाप्रकारे विधाने, त्यांची भूमिका उघड आहे. उद्धव ठाकरे आणि आमच्यात वाद झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडत आहेत आणि आमची भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे वाद झाला, आता सोबत येणार नाही वैगेरे या चर्चेला अर्थ नाही, असेही काँग्रेस नेते ठाकरे म्हणाले. त्याचसोबत राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community