सामांन्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? पटोलेंचा फडणवीसांना सवाल!

आमच्या मागण्या जर केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत तर आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस नेते आणि कार्याकर्त्यांनी गुरुवारी सायकल रॅली काढली. इंधन दरवाढीविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यासाठी हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. त्यावर ही रॅली केवळ नौटंकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला नाना पटोले यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. फडणवीस सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत का, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

काय म्हणाले पटोले?

काँग्रेसने काढलेली सायकल रॅली ही जर फडणवीस यांना नौटंकी वाटत असेल, तर सामान्य माणसाचं जगणं केंद्रातील भाजप सरकारने मुश्कील केले आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का?” असे नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. इंधन दरवाढ, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची माहिती आणि राज्याला जास्तीत-जास्त लसींचा पुरवठा व्हावा, अशा मागण्या करणारे निवेदन पत्र काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले. या मागण्या जर केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत तर आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशांराही पटोलेंनी दिला आहे.

(हेही वाचाः सरकारचा आमदारांवर विश्वास नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी घेण्याचा घाट!)

काय म्हणाले होते फडणवीस?

काँग्रेसच्या नेत्यांनी इंधन दरवाढीमुळे केंद्राच्या विरोधात हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत सायकल रॅली काढली. त्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करांपैकी ३० रुपये थेट राज्य सरकाराला मिळतात, त्यानंतर केंद्राकडे जाणाऱ्या रक्कमेतूनही २३ रुपयेदेखील पुन्हा राज्यालाच मिळतात. त्यामुळे इंधनावर दर कमी करणे राज्याला जमू शकते, त्यांनी २ टक्के कर कमी करावा. राज्याला इंधनावरील करापोटी २४ हजार कोटी मिळाले आहेत, म्हणून काँग्रेसचे आंदोलन नौटंकी आहे, असेही फडणवीस म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here