२३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघीडीच्या युतीची घोषणा केली गेली. यावेळी लवकरच शरद पवारही आमच्यासोबत येतील असं प्रतिपादन प्रकाश आंबेडकरांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी ही चार चाकी झाल्याचे म्हटले जात होते. पण शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले.
गोंदियातील एका खासगी कार्यक्रमासाठी बोलत असताना भाजपवर निशाणा साधत त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीबाबतही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीशी महाविकास आघीडाचा संबंध नाही. तसेच याबाबत आमच्याकडे कुठलाच प्रस्ताव नाही, असे नाना पटोले म्हणाले. तसेच गोंदियाचे पालकमंत्री (राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार) यांच्याबद्दल काय बोलावे. त्यांच्या ताब्यात सत्ता आहे. त्यामुळे सत्तेचा माज त्यांना आला आहे, अशी टीका पटोलेंनी मुनगंटीवारांवर केली.
दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीशी मविआचा संबंध नाही, या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही राहुल गांधींसोबत बोलू. माझी राहुल गांधींसोबत त्याविषयी चर्चा झाली आहे.’
(हेही वाचा – आंबेडकरांनी जरा जपून शब्द वापरावे; शरद पवारांसंबंधित ‘त्या’ विधानावरुन राऊतांनी सुनावले)
Join Our WhatsApp Community