२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कर्नाटक दौऱ्यावेळी ‘सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?’ असा सवाल उपस्थित केला होता. याच वक्तव्यावरून गुरुवारी, गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राहुल गांधींना २ वर्षांनी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला होता. पण आता लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1639187379629228033
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार जर कुठल्याही लोकप्रतिनिधीला कुठल्याही न्यायालयाने किमान २ वर्षांची शिक्षा ठोठावली, तर त्या लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व तात्काळ बडतर्फ होत असते. त्याच दृष्टीकोनातून लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यामुळे आता ते आगामी निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच माहितीनुसार, हे निलंबन ६ वर्षांसाठी असल्यामुळे राहुल गांधी ६ वर्षात लोकसभेची निवडणूक लढवू शकणार नाही.
दरम्यान लोकसभा सचिवालयाच्या कारवाईनंतर काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. शुक्रवारी पावणे चार वाजता दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींवरील विरोधकांच्या घोषणाबाजीवरून सुधीर मुनगंटीवार संतापले; म्हणाले, कुणाच्या औकातीत…)
Join Our WhatsApp Community