Rahul Gandhi रायबरेली सोडणार की वायनाड? निर्णय झाला; उमेदवारही निश्चित

170
Election : महाराष्ट्रासोबत वायनाडमध्ये निवडणूक होणार!

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना रायबरेली किंवा वायनाड यापैकी एका मतदार संघाची खासदारकी सोडावी लागणार आहे. रायबरेली आणि वायनाड येथील जनतेने राहुल गांधी यांना राजीनामा देण्यासाठी आपला प्रतिनिधी निवडला होता काय? असा खंत वायनाडवासियांच्या मनात निर्माण झाली आहे. (Rahul Gandhi)

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदार संघाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदार संघातून मैदानात उतरले होते. राहुल गांधी दोन्ही मतदार संघातून निवडून आले आहेत. यामुळे दोन पैकी कोणत्याही एका मतदार संघाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अशात, राहुल गांधी कोणत्या मतदार संघातील लोकांच प्रेम धूडकावून लावतील? याची चर्चा सर्वाधिक रंगली आहे. (Rahul Gandhi)

सूत्रानुसार, राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदार संघाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. वायनाडच्या जनतेने त्यांना ऐनवेळी लोकसभेत निवडून पाठविले होते. मदतीचा हात दिला होता. आता राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देण्याचा विचार करीत आहेत. यामुळे, हेची फळ काय आमच्या श्रमाला? असा प्रश्न वायनाडवासियांना पडला आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा यांना वायनाडमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे पक्षाकडून टाळले जात आहे. (Rahul Gandhi)

निवडणुकीतील विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राहुल गांधी बुधवारी वायनाड येथे गेले होते. यावेळच्या भाषणानंतर राहुल गांधी यांचा राजीनामा आणि प्रियंका गांधी यांना उमेदवारी अशा चर्चांनी जोर धरला. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Canada : ‘चहलच्या आधी कुलदीपचा संघात समावेश व्हावा,’ – पियुष चावला)

किंतु परंतुला वाव नाही

रायबरेलीची खासदार की कायम ठेऊन राहुल गांधी उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे राजकारण मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे, केरळ आणि वायनाडच्या जनतेच्या मनातील जागा कायम ठेवण्यासाठी प्रियांका गांधी वाड्रा यांना पोटनिवडणुकीत उतरवले जाऊ शकते. वायनाडची जागा रिकामी करून प्रियंका यांनी निवडणूक लढवली तर काँग्रेसीचा विजय नक्की आहे आणि वायनाडवासियांसोबत गांधी कुटुंबाची नाळ जुळून राहील असे त्यांना वाटतं आहे. (Rahul Gandhi)

प्रियांकाला फायदा होऊ शकतो

गुरुवारी वायनाडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पोस्टरद्वारे प्रियांका यांना तिथल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी केली होती. तथापि, केरळ काँग्रेस वायनाडमधून गांधी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्याच्या बाजूने आहे. राहुल गांधी यांनी जागा सोडली तर प्रियांकाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना वाईनादमधून उतरविले जाईल. केरळमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि काँग्रेसला सत्तेत परत येण्यासाठी राज्यात गांधी कुटुंबाची थेट सक्रिय राजकीय भूमिका कायम ठेवायची आहे. (Rahul Gandhi)

मुरलीधरन परतणार आहे

प्रियंका गांधी यांनी काही कारणास्तव लढण्यास नकार दिला तर केरळचे नेते के मुरलीधरण यांना वायनाडमधून उमेदवारी देण्याच्या बाजूने आहेत. मुरलीधरन हे त्रिशूरमधून भाजपाचे नेते सुरेश गोपी यांच्याकडून नुकतेच पराभूत झाले आहेत. गोपी आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. पण केरळ काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये मुरलीधरन यांची गणना होते आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सन्माननीय भूमिकेत परत आणण्यासाठी पक्ष गंभीर आहे. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.