मोदींना काँग्रेसकडून किमान 80 वेळा शिव्या; भाजपकडून नेत्यांच्या नावांची यादी जाहीर

149

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, नागपूरचे शेख हुसेन यांच्यापाठोपाठ काॅंग्रेसचे दुसरे नेते सुबोधकांत सहाय यांची जीभ पुन्हा घसरली. त्याबरोबर काॅंग्रेस नेत्यांनी अलीकडच्या काळात मोदींना उद्देशून ऑन रेकाॅर्ड वापरलेल्या तब्बल 80 अपशब्दांचा शिव्यांची यादीच भाजपने अधिकृतरित्या जाहीर केली. भाजपने संबंधित नेत्यांचे उद्गार जसेच्या तसे तारीखवार दिले आहेत.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मागील आठवड्यात चौकशी सुरु केली. त्यानंतर काॅंग्रेसने देशभरात सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली. या वेळी मोदींवर टीका करताना, या पक्षाच्या अनेक नेत्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले.

…तर ही यादी मोठी होईल

सहाय यांच्या वक्तव्यानंतर भाजपने जाहीर केलेल्या केवळ आजी माजी काॅंग्रेस नेत्यांबाबतच्या तपशील आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, पंजाबचे भगवंत मान, तामिळनाडूचे एम.के. स्टॅलीन या विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशिवाय वृंदा करात, पी. विजयन आदी माकप नेते, एमआयएम नेते असुरुद्दीन ओवैसी, सपा नेते अखिलेश यादव, बसपा प्रमुख नेत्या मायावती यांच्यासारख्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी व शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी मोदींबाबत वापरलेल्या अपशब्दांची यादी केली तर ही यादी शेकडोंच्याच नव्हे हजारोंच्या, लाखोंच्या घरात जाईल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: शाब्बाश ‘एकनाथ’…नाहीतर लवकरच तुझा ‘आनंद दिघे’ झाला असता; राणेंचे सूचक ट्वीट)

2009 पासूनची यादी

बी.के. हरिप्रसाद यांनी 2009 मध्ये मोदींबद्दल अपशब्द वापरला होता. तेव्हापासून सहाय यांच्यासह विविध काॅंग्रेस नेत्यांचे अपशब्द भाजपने नमूद केले आहेत. मोदी यांना मौत का सौदागर विषाची शेती करणआरे, चौकीदार चोर असेही म्हणण्यात आले. अनेक प्राण्यांशी त्यांची तुलना करण्यात आली. विलास मुत्तेमवार यांनी 25नोव्हेंबर 2018 रोजी मोदींबाबत अनुदार उद्गार काढले होते. भाजपवारी झालेले हार्दिक पटेल व तुरुंगात असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांचे अनुदार उद्गारही यादीत समाविष्ट आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.