नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न ही म्हण देशातील विरोधी पक्षांची आघाडी आयएनडीआयएवर अगदी तंतोतंत लागू होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासोबत कोणत्याही निवडणुकीत आघाडी करण्याला काँग्रेसचे नेते कडाडून विरोध करीत असल्याची प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी देशातील २६ पक्षांनी एकत्र येऊन आयएनडीआयए नावाची आघाडी बनविली आहे. या सर्व पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत रालोआच्या उमेदवाराविरूध्द एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, असे असले तरी काँग्रेसचे नेते आम आदमी पक्षासोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करण्यासाठी विरोध करीत आहे. आपमुळे दिल्ली, पंजाब, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये काँग्रेसचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत केजरीवाल यांच्या पक्षासोबत हातमिळवणी केली जाऊ नये, असा आग्रह काँग्रेस नेत्यांकडून धरला जात आहे.
गुजरात, गोवा आणि हरियाणा या राज्यांतील काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेतील ‘आप’सोबतच्या जागा समन्वयाबाबत हायकमांडला इशारा देण्यास सुरुवात केली आहे. विरोधी ऐक्यासाठी ‘आप’ला जागा देण्याची जोखीम पत्करली तर या राज्यांतील काँग्रेसच्या राजकारणावर विपरीत परिणाम होईल, असे या नेत्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. आघाडीतील नेते लोकसभा निवडणुकीत जागा वाटप कसे असेल यावर चर्चा करण्यासाठी दबाव टाकत आहे. पण काँग्रेस अजूनही या मुद्द्यांवर तोंड उघडायला तयार नाही. ‘आप’च्या या दबावाचा पुरावा अलका लांबा यांच्या सातही जागांवर निवडणूक लढवण्याच्या विधानावरून दिसून आला, त्यानंतर दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडशी पुढील निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली.
(हेही वाचा – फडणवीसांवरील टीका खपवून घेणार नाही!; Pravin Darekar यांचा उद्धव ठाकरेंना इशारा)
आम आदमी पक्ष हरियाणात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करून आपचा एक जरी खासदार निवडून आला तर त्याचा काँग्रेसच्या राजकारणावर विपरित परिणाम होईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष भूपिंदरसिंग हुड्डा यांना सध्या तरी अशा प्रस्तावाला मान्यता देण्यास वाव नाही. पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा ‘आप’सोबतच्या जागावाटपाच्या विरोधात उघडपणे बोलणे टाळत आहेत.
‘आप’च्या दबावामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो –
केजरीवाल यांचा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत जागा मिळविण्यासाठी काँग्रेसवर दबाव आणत आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरूध्द उमेदवार उतरविण्याची तयारी करीत आहे. यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये छत्तीसचा आकडा निर्माण झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community