काँग्रेस झालं कमकुवत! सुशील कुमार शिंदेंनीच केलं मान्य

78

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच काँग्रेसमधील एक गट देखील नाराज असल्याने पक्षामध्ये गृहकलह निर्माण झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नमते घेणार असल्याचे दिसतेय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले असून कमकुवत झालेल्या काँग्रेसने ‘आप’ला आर्त हाक दिली असताना काँग्रेस कमकुवत झाला असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच मान्य केले आहे.

(हेही वाचा – आम्हाला पण तुमच्यात घ्या ना! कमकुवत झालेल्या काँग्रेसची ‘आप’ला हाक)

दरम्यान, आता माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसच्या नाराज गटाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा अनेक चुकांमुळे कमकुवत झाला असून, पंजाबमधील पराभवाला दोन व्यक्ती जबाबदार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे यांनी एका वृत्त पत्रात लेख लिहीत असे म्हटले, निवडणुकांचे निकाल आणि एकूणच काँग्रेसमधील परिस्थिती यावर भाष्य केले आहे. निर्णायक लढतीत सतत येणार्‍या अपयशामुळे हा पक्ष अस्तित्वहीन होताना दिसतो आहे. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे सुशीरकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

लेखात काय म्हटले?

देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमके कुठे चुकले, काय करायला हवे आणि देशातील सध्याची एकूणच राजकीय स्थिती यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मत मांडले आहे. सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खाप हे नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर फोडले आहे. पंजाबमध्ये या दोघांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. दोघांच्या वर्तणुकीमुळे सरकार येऊ शकले नसल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पंजाबमध्ये ३२ टक्के मागासवर्गीय जनता आहे. त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा नेता मुख्यमंत्री असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाले, असे शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.