उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डरवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी नितीन राऊत यांना रोखले. नितीन राऊत यांना नुसते रोखलेच नाही तर परवानगी देण्यास नकार दिला तसेच त्यांनी ताब्यातही घेतले. काँग्रेसने ट्विट करत ही माहितील दिली असून, पोलिसांंनी रोखल्यानंतर राऊत यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून, ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री व दलित कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinRaut_INC को आजमगढ़ बॉर्डर पर डिटेन कर लिया गया।
यूपी सरकार दलित प्रधान की हत्या तो नहीं रोक पाई लेकिन अब श्री सत्यमेव जयते के घर पहुंचने वाले संवेदना संदेशों को रोकने में लगी है। pic.twitter.com/MwrQ3BPWi4
— UP Congress (@INCUttarPradesh) August 20, 2020
दरम्यान काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला असून, युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकले नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असे काँग्रेसने म्हटलं आहे.उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीवर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी टीका केली. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी झाल्यापासून त्यांनी स्थानिक प्रश्न उचलून धरले आहेत. यापूर्वी प्रियंका गांधी यांनाही अशाप्रकारे अडवण्याचा प्रयत्न झाला होता. काँग्रेसच्या नेत्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या खून आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. काँग्रेसकडून याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच नितीन राऊत आझमगढ येथे गेले होते. मात्र, एका मंत्र्याला अशाप्रकारे पोलिसांनी अटक करणे ही निषेधार्ह कृती असल्याचे राजीव सातव यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Communityआज़मगढ़ से पहले गौरा-बादशाहपुर में दलित कांग्रेस अध्यक्ष एवं महाराष्ट्र सरकार मंत्री @NitinRaut_INC जी, भगवती चौधरी और कांग्रेस के कार्यकर्ताओं के साथ हमे रोक लिया गया है ,
डॉ नितिन राउत जी इस तानाशाही के खिलाफ यहीं धरने पे बैठ गए हैं। pic.twitter.com/mnPMu6s1fY— Pradeep Narwal प्रदीप नरवाल پردیپ نارووال (@Narwal_inc) August 20, 2020