सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, त्यातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित होत आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांची नावे दिली आहेत. त्यामध्ये चंद्रकांत हंडोरे यांचे नाव चंद्रकांत हंडुरे असे नाव छापले आहे. अशा प्रकारे काँग्रेसची ही प्रिंटिंग मिस्टेक समोर आली आहे. अशा प्रकारे काँग्रेस पक्षाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
(हेही वाचा विधान परिषद निवडणूक : काँग्रेस, शिवसेना, भाजपची यादी तयार, राष्ट्रवादीची गुलदस्त्यात!)
याआधीही झालेली प्रिंटिंग मिस्टेक
याआधी २००४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने १९९५पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्यात येतील, असे छापले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसने चक्क ती प्रिंटिंग मिस्टेक होती, असे जाहीर केले होते. काँग्रेसचा हा भोंगळ कारभार सुरूच आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन उमेदवारांची नावे आहेत. त्यात भाई जगताप आणि दुसरे चंद्रकांत हंडोरे यांची नावे आहेत. त्यामध्ये चंद्रकांत हंडोरे यांचे नाव चंद्रकांत हंडुरे असे नाव छापले आहे. अशा प्रकारे चंद्रकांत हंडुरे नावाचा उमेदवार नाही, असे काँग्रेसवाले सांगत आहेत, अशा प्रकारे काँग्रेसची ही दुसरी प्रिंटिंग मिस्टेक समोर आली आहे. काँग्रेसचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे.
(हेही वाचा अखेरीस बविआच्या मतांसाठी शरद पवारांची मध्यस्थी)
काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप गुरुवार, ९ जून २०२२ दुपारी १२.३० वा. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Join Our WhatsApp Community