चित्रा वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

105

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा शहाजीबापू पाटील यांचा हा डायलॉग सुपरहिट झाल्यानंतर त्यावर अनेक गाणी देखील बनवण्यात आली आहेत. पण याच गाण्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेसोबत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा करत त्यांनी चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांना काय नाना तुम्ही पण झाडी,डोंगर आणि हाटीलात?, असा खोचक सवाल केला आहे. या व्हिडिओबाबतची सत्यता अजूनही कळली नसून, नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे.

(हेही वाचाः OBC RESERVATION : राज्यात किती महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील ओबीसी?)  

कायदेशीर कारवाई करणार- पटोले

मी सध्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौ-यावर आहे. पण सध्या राजकारणाची परिस्थिती फार खाली उतरली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणा-या लोकांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. पण याबाबत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगत नाना पटोले यांनी या व्हिडिओबाबत केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच चित्रा वाघ यांच्याबाबत आम्हाला काही बोलायचं नाही. या प्रकरणात आमची कायदेशीर टीम लक्ष घालत असून, लवकरच सत्य सर्वांसमोर येईल असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मलाही आश्चर्य वाटलं- वाघ

हा व्हिडिओ ट्वीट करत नानांवर आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. हा व्हिडिओ पाहिला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं होतं. तो व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा तपासून बघितला. तो व्हिडिओ सामान्य व्यक्तीचा नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी ट्वीट करत या व्हिडिओच्या सत्यतेबाबत नाना पटोले यांना विचारलं असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.