फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसचा आमदार मातोश्रीवर, मविआत कुरघोडी?

225
फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसचा आमदार मातोश्रीवर, मविआत कुरघोडी?
फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसचा आमदार मातोश्रीवर, मविआत कुरघोडी?

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसचा आमदार मातोश्रीवर पोहोचल्या आणि महाविकास आघाडीत कुरघोडी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे.

(हेही वाचा – रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण)

प्रतिभा धानोरकर शिवसेनेकडून (उबाठा) कडून लढणार?

या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतिभा बाळू धानोरकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांचे कुटुंबिय हे २०१९ च्या आधी शिवसेनेत होते. त्यामुळे धानोरकर कुटुंब आता पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये देखील आपसात एकमेकांच्या विरोधात कुरघोडी सुरू आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.