सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यातच काँग्रेसच्या (Congress) आमदाराने सभेत थेट मतदारांना धमकी दिली आहे. बेळगावी जिल्ह्यातील कागवाडचे काँग्रेसचे आमदार राजू केज यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी ही धमकी दिली.
केज यांनी कर्नाटकच्या जुगुलतोमधील एका प्रचारसभेत मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्ही आमच्या पक्षाला मोठ्या बहुमताने जिंकवले नाही तर आम्ही तुमच्या घरांचा वीजपुरवठा बंद करू, मी माझ्या शब्दांवर ठाम आहे, अशी धमकी दिली. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोणी पंतप्रधान होणार नाही का? अनेक तरुण म्हणतात की, मोदी तर मोदी आहे. अरे पण तुम्ही त्यांच्यामागे लाळ गाळत का फिरताय?, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा Congress : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात, मतदान काँग्रेस किंवा डाव्यांना करू नका तर भाजपाला करा)
काँग्रेसचे आमदार (Congress) राजू केज म्हणाले, तुम्ही आम्हाला मत दिले नाही तर आम्ही तुमची वीज बंद करू आणि मी माझ्या शब्दांवर ठाम आहे.” राजू केज यांनी याआधीदेखील अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. केज यांनी मंगळवारी, ३० एप्रिल एका प्रचारसभेत पंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमदार केज म्हणाले की, “१४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोणी पंतप्रधान होणार नाही का? अनेक तरुण म्हणतायत की, मोदी तर मोदी आहे. अरे पण तुम्ही त्यांच्यामागे लाळ गाळत का फिरताय?” यापूर्वी ममदापूरमधील एका प्रचारसभेला संबोधित करताना केज म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप आलिशान आयुष्य जगतात.
Join Our WhatsApp Community