काँग्रेसवाले (Congress) देशामध्ये डॉ. बाबासाहेबांचे नाही तर त्यांचे स्वतंत्र संविधान चालवायाला पाहत आहेत. तसा प्रयत्न आणीबाणीमध्ये केला होता. आता वेगळे पुस्तक छापून संविधानाची थट्टा उडविण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला आहे. त्यांनी ७५ वर्ष दोन संविधान चालविण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. ३७० ची भिंत उभारण्याचे काम त्यांनी केले. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर या कलमाला जमीनीत गाडण्याचे काम केले, असेही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा Muslim : मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी निकाह न लावण्याचा काझीचा निर्णय)
दिल्लीत मोदी सरकार आले, पण या आनंदात नांदेडचे फुल नव्हते. त्यामुळे आता मी दिल्लीला नांदेडमधून कमळाचे फुल पाठविण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून मोदीसाठी ही मदत मागत असून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरियाणाच्या निवडणुकीत पहिल्यापेक्षा जास्त नाही तर इतिहासात सर्वाधिक जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार पाहिजे, असेही ते (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community