‘माझी जीभ घसरली, मला…’ अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी

72

काँग्रेसचे लोकसभा गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला होता. त्याबाबत त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत असताना, आपल्याकडून हे विधान चुकून झाल्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नसल्याचे चौधरी यांनी म्हटले होते. पण अखेर त्यांनी नरमाईची भूमिका घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत त्यांची माफी मागितली आहे.

चौधरींनी मागितली माफी

काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावरुन संसदेत भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत होती. पण आपल्याकडून चुकून तसा उल्लेख झाल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते. पण अखेर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून त्यांची माफी मागितली आहे.

(हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जानव्याचे महत्व सरकारी पुस्तकातून वगळले)

माझ्याकडून चूक झाली आहे. माझी जीभ घसरली, त्याबद्दल मी माफी मागतो आणि तुम्ही ती स्वीकारावी, अशी विनंती करत चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे.

काय आहे प्रकरण?

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी मुर्मूंचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला आहे. मी बोलताना आधी राष्ट्रपती असंच म्हणालो होतो, पण त्यानंतर माझ्या तोंडून चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात भाजप-शिंदे गट जिंकणार? काय सांगतो सर्व्हे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.