काँग्रेसचे चौधरी ‘अधीर’ झाले आणि राष्ट्रपतींचा अपमान करुन बसले, पण तरीही माफी न मागण्यावर ठाम

101

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील वाद-विवादांसाठी प्रसिद्ध आहेत. पण नुकतीच चौधरी यांच्याकडून फार मोठी घोडचूक झाली असून, ते चांगलीच अडचणीत आले आहेत. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. चौधरींच्या या घोडचुकीमुळे भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत आता चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी मुर्मूंचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला आहे. मी बोलताना आधी राष्ट्रपती असंच म्हणालो होतो, पण त्यानंतर माझ्या तोंडून चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

मला फाशीची शिक्षा द्या

माझ्या चुकीच्या विधानाचा पत्रकारांकडून विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यावेळीच पत्रकारांना माझी चूक झाल्याचे सांगितले होते. देशाच्या राष्ट्रपती कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या असल्या तरी त्या आमच्यासाठी केवळ आणि केवळ राष्ट्रपतीच असणार आहेत. पण माझ्याकडून ही एकदाच चूक झाली आहे. पण विरोधकांकडून राईचा पर्वत करण्यात येत आहे. माझ्या या चुकीसाठी मला फाशीची शिक्षा झाली तरी मी भोगायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.