…तर कारवाई करू, राहुल गांधींना देवेंद्र फडणवीसांचा इशारा

95

भारत जोडी यात्रा महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अवमान केला, त्याचे राज्यभर पडसाद उलटले. राहुल गांधींच्या विरोधात ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. असा स्थितीत राहुल गांधी शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे सभा घेणार आहेत, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना कायद्याच्या चौकटीत राहून काय ते करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.

अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल

आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांनी बिघडवू नये, असेही फडणवीस म्हणाले. गुजरातच्या भावनगर येथे फडणवीस निवडणूक प्रचाराला गेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण काँग्रेसला लक्षात आले आहे की, भारताची जनता मोदीशी जोडलेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचे असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवे, अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, तसेच भाजपाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मक भावना आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या लोकांवर कारवाई करण्याचा फायदा नसतो. अनेक केसेस त्यांच्यावर यापूर्वीही झाल्यात. ते जामीनावरच बाहेर आहेत. अनेकदा न्यायालयात हजर राहत नाही म्हणून वॉरंट निघतात. ते जे खोटे बोलतायेत त्यावर आम्ही उत्तर देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा शरद पवार म्हणतात, सावरकरांप्रति अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.