राज्यसभेत कॉंग्रेसकडून गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे, तर रजनी पाटील यांच्याकडे व्हीपची जबाबदारी

102

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबनाची कारवाई झालेल्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांची काँग्रेसकडून व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रमोद तिवारी यांची काँग्रेसच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद आनंद शर्मा यांच्याकडे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून उपरोक्त माहिती दिली आहे.

( हेही वाचा : मृत्यू की घातपात? सतीश कौशिक प्रकरणाला वेगळे वळण, हत्या केल्याचा दावा)

दरम्यान राज्यसभा गटनेतेपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच तूर्तास कायम आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपद खर्गे यांच्याकडे आल्यानंतर राज्यसभेतील गटनेता बदलला जाईल, अशी चर्चा होती. मात्र तसा बदल झाला नाही.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे अधिवेशन काळात निलंबन करण्यात आले होते. राज्यसभेचे कामकाज संपेपर्यंत चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली नव्हती. ती व्हायरल करण्याचे काम दुसऱ्या कोणीतरी केले होते. त्यामध्ये रजनीताईंचा हात नव्हता. दुसऱ्या दिवशी रजनी पाटील या सभागृहात बसल्या होत्या. आपल्याला निलंबित केलं जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. अचानक त्यांच्यावर कारवाई झाल्याची घोषणा झाली दरम्यान, हे प्रकरण हक्कभंग समितीकडे प्रलंबित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.