लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपेक्षेपेक्षा अधिक खासदार निवडून आले, विशेष म्हणजे राज्यात काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत. या निवडणुकीत मशिदींमधून, मोहल्ला मोहल्ल्यातून महायुतीच्या विरोधात पर्यायाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे फतवे काढण्यात आले, त्यानुसार मुसलमानांनी (Muslim) एक गठ्ठा मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. आता महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसच्या खासदारांची मुसलमानांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी चढाओढ लागली आहे. यात अक्षरशः विजयाचा उन्माद दिसून येत आहे.
काँग्रेस खासदार बच्छाव यांचा गोवंश हत्येसाठी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव
बकरी ईदच्या निमित्ताने गोवंश हत्येसाठी नगरसेवकांचे बंधू अब्दुल लतीफ डॉन याने काँग्रेसचे खासदार शोभा बच्छाव यांना फोन केला तेव्हा त्यांच्यातील फोनवरील संभाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर भाजपाने ट्विट करून शोभा बच्छाव यांच्यावर टीका केली. यामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने खासदार शोभा बच्छाव यांनी गोवंश कत्तलीसाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी मालेगाव येथील १ कोटी रुपयाचा गोवंश जप्त केला. तो गोवंश बकरी ईदच्या आधी सोडवून द्या, अशी विनंती अब्दुल लतीफ डॉन करत होता, त्यावेळी खासदार बच्छाव यांना ते म्हणाले की, ‘ताई, आम्ही तुम्हाला निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी मालेगाव येथून खूप प्रयत्न केले, त्यामुळे विजय झाला, आता आमची १ कोटींची जनावरे पोलिसांनी पकडली आहेत, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला ते मिळाले नाही तर काही उपयोगाचे नाही, असे म्हटल्यावर खासदार बच्छाव म्हणाल्या, मी पोलीस अधीक्षकाशी बोलले आहे, पोलीस अधिकारी देवेन भारती यांच्याशीही बोलले आहे. अशा रीतीने निवडणुकीत जिंकून दिल्याबद्दल आता मुसलमान आता काँग्रेसच्या खासदारांचा वापर करू लागले आहेत. (Muslim)
(हेही वाचा Ayodhya Raam Mandir परिसरात पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर)
खासदार धानोरकरांच्या भावाकडून प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. तसेच मारहाण केल्याचा गंभीर प्रकारही घडला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचा सख्खा भाऊ प्रवीण काकडे हे आघाडीवर होते. काँग्रेसच्या खासदार धानोरकर जिंकून येताच त्यांच्या भावाकडून गुंडगिरी सुरु झाली आहे.
मुस्लिमांसाठी अनिल देसाईंनी देवनार कत्तलखान्यात घेतली धाव
आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला देवनार पशुवध गृह अर्थात देवनार कत्तलखान्यात ईद सणानिमित्त देशभरातून बकरी आणि शेळ्या विक्रीला आणल्या जातात. या सणानिमित्त महापालिकेच्यावतीने बकरी विक्री करता व्यापाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांची माहिती दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उबाठाचे खासदार अनिल देसाई यांनी पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. उबाठा शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले खासदार अनिल देसाई यांनी देवनार कत्तलखान्यात प्रथम का होईना पाय लावून तिथे महापालिकेने पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेत आता तुम्हाला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांची गरज नाही आम्ही आपल्यासाठी कायम उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. ज्या मुस्लिम मतांच्या जोरावर अनिल देसाई हे निवडून आले आहेत, त्यांना आता त्यांच्यासाठी काम करावेच लागेल आणि उबाठा शिवसेना आता मुस्लिमांची (Muslim) कैवार झाली आहे. आपल्या कामाची सुरुवात देसाई यांनी मुस्लिमांपासून (Muslim) केल्याने हे स्पष्ट होते,असे नागरिकांकडूनच बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community