रिचा चड्डाच्या देशविरोधी वक्तव्याचे काँग्रेस नेत्या अभिनेत्री नगमाकडून समर्थन

अभिनेत्री रिचा चड्डा हिने फझल अली याच्यासोबत निकाह केल्यानंतर दीड महिन्यातच तिने भारतीय सैन्याचा अवमान केला. भारतीय सैन्याची खिल्ली उडवणारे ट्विट केले. त्यामुळे सोशल मीडियात वादंग माजले. त्या रिचा चड्डाचे काँग्रेसने समर्थन केले. काँग्रेसच्या नेत्या, अभिनेत्री नगमा मोरारजी हिने याचे समर्थन केले आहे.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी भारताचे सैन्याधिकारी लेफ्ट. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ‘आम्ही पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यास सक्षम आहे. आम्ही सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत. पाकिस्तान काही कृती करण्याआधीच आम्ही आमचे ऑपरेशन पूर्ण करू’, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर रिचा चड्डा हिने ‘गलवान से हाय’ अर्थात ‘गलवान आठवण करत आहे’. अशा प्रकारे रिचाने थेट भारतीय सैनिकांची खिल्ली उडवली आहे. गलवानचा उल्लेख करून रिचाने भारतीय सैनिकांच्या क्षमतेची चेष्टा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. रिचा चड्डाच्या ट्विटवर कर्नल अशोक कुमार सिंह यांनी लिहिले की, “रिचा चड्ढाच्या गलवान ट्विटवर वाद. मला वाटत नाही की तिने सैनिकांच्या बलिदानाची खिल्ली उडवली आहे, तर ती एका सर्व्हिंग जनरलने निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी केलेल्या राजकीय विधानाला लक्ष्य करत होती. जेव्हा सैन्याचे राजकारण होते तेव्हा टीका आणि उपहासासाठीही तयार राहा;, असे म्हटले. त्यावर कर्नलच्या या ट्विटला रिट्विट करत नगमाने लिहिले, ‘अगदी बरोबर सांगितले.’ काँग्रेसच्या एका महिला नेत्याचे असे ट्विट पाहिल्यानंतर युजर्स भडकले आणि लष्कराच्या जवानांबद्दल अपशब्द बोलणारी ती कोण आहे, असे विचारू लागले.

(हेही वाचा वीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना अमित शाहांचे आव्हान, म्हणाले…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here