अखेर नारायण राणेंना जामीन मंजूर! आता पुढे काय?

महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह संपूर्ण राणे कुटुंब तिथे दाखल झाले होते.

71

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येनकेन प्रकारेण अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अटक हा विषय मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा बनवला. मात्र आता हा विषय जास्त ताणू नये, या विषयावर पडदा टाकावा, असा सल्ला महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दुसरीकडे रात्री उशिरा महाडच्या न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला.

तासभर न्यायालयाचे काम चालले!

महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह संपूर्ण राणे कुटुंब तिथे दाखल झाले होते. दरम्यान, नारायण राणे जबाबदार व्यक्ती आहेत, असे असतानाही ते बेजबाबदारीने का वागले? असा प्रश्न सरकारी वकिलाकडून उपस्थित करण्यात आला होता. तर, नारायण राणेंच्या वकिलानी यावर युक्तीवाद करत म्हटले की, त्यांच्यावर लावली गेलेली कलमे चुकीची आहेत. २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ हा युक्तीवाद सुरू होता. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद केला. जवळपास तासभर न्यायालयाचे कामकाज चालले.

(हेही वाचा : राणेंची अटक पण अनिल देशमुख मात्र मोकाट! ट्विटरवर सुरु झाला ट्रेंड)

महाविकास आघाडीचा सरकारच्या मंत्र्यांची झाली बैठक 

नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थितीत  होते. या बैठकीत नारायण राणे यांना जामीन मिळावा, आता हे प्रकरण आणखी वाढू नये, असा सल्ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दिला होता होता.

राणेंची जन आशीर्वाद होणार का?

राणे यांना जामीन मिळाला तरी ते प्रकृतीच्या कारणामुळे जन आशीर्वाद यात्रा करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. मात्र अधिकृतपणे भाजपच्या वतीने याविषयी भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.