डोंगरीच्या आयटीआयला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे नाव देण्यास Congress चा विरोध

48
डोंगरीच्या आयटीआयला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे नाव देण्यास Congress चा विरोध
  • प्रतिनिधी

डोंगरी आयटीआयच्या नामकरणाचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संस्थेला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थानिक काँग्रेस (Congress) आमदार अमिन पटेल यांनी याला तीव्र विरोध दर्शवत, या आयटीआयला “हाजी हजरत शाह बाबा” यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

मात्र, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मात्र आपला निर्णय अंतिम असल्याचे सांगत, डोंगरी आयटीआयला अब्दुल कलाम यांचेच नाव देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

नामकरणाबाबत राजकीय वाद

संपूर्ण महाराष्ट्रात ३५० आयटीआय आहेत. यापूर्वी या आयटीआय यांना कोणतीही अधिकृत नावे नव्हती आणि त्या स्थानिक नावांनी ओळखल्या जायच्या. मात्र, आता या सर्व संस्थांना राष्ट्रीय किंवा स्थानिक महापुरुषांची नावे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डोंगरी आयटीआयसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव निश्चित करण्याचा निर्णय झाला. मात्र, काँग्रेस (Congress) आमदार अमिन पटेल यांनी या निर्णयाला विरोध केला आणि हाजी हजरत शाह बाबा यांचे नाव देण्याची मागणी केली.

(हेही वाचा – Kharghar Ijtema नंतर धर्मांधांनी केली हिंदूची हत्या; बजरंग दलाने दिली कारवाईची चेतावणी)

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत वाद उफाळला

चार दिवसांपूर्वी मुंबई जिल्हा नियोजन मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत काँग्रेस (Congress) आमदार अमिन पटेल उपस्थित होते. यावेळी त्यांनी डोंगरी आयटीआयला डॉ. कलाम यांचे नाव देण्यास विरोध दर्शवला.

मात्र, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कलाम यांच्या योगदानाची महत्ता अधोरेखित करत, या निर्णयामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

“अब्दुल कलाम यांच्या नावालाच प्राधान्य” – लोढा

“डॉ. कलाम हे संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते एक महान शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती होते. त्यांच्या नावाने आयटीआयला संबोधणे हा अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे या संस्थेला त्यांचेच नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये (Congress) राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – प्रसिद्ध किर्तनकार आणि व्याख्यात्या डॉ. रश्मी घोलप यांचे Maharashtra Military School मध्ये व्याख्यान संपन्न)

विद्यार्थ्यांना मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव मिळावा म्हणून खास उपक्रम

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क” उपक्रमांतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला.

या उपक्रमाद्वारे निवड झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थेट मंत्रालयात येऊन प्रत्यक्ष शासकीय विभागांची माहिती मिळावी, तसेच प्रशासकीय कार्यपद्धती समजावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी मंत्रीपदाची खुर्ची रिकामी

मंत्रालयातील आपल्या दालनात या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना, मंत्री लोढा यांनी स्वतःची खुर्ची सोडली आणि विद्यार्थ्यांना त्या खुर्चीत बसण्याची संधी दिली.

या कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील आणि संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होत्या.

(हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट, रोहितला एकदिवसीय प्रकारात चांगला सूर गवसेल’ – संजय बांगर )

शॅडो मंत्रिमंडळाच्या प्रमुख नेमणुका :
  • मुख्यमंत्री – समृद्धी तुपे
  • गृहमंत्री – रिया खानोलकर
  • उपमुख्यमंत्री – पार्थ थोरवत, आर्यन दराडे
  • सभापती – पर्णवी धावरे
विद्यार्थ्यांसाठी नवी संधी

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सरकारच्या कामकाजाची माहिती मिळेल, धोरणांचे निर्णय कसे घेतले जातात, हे समजेल आणि भविष्यात त्यांना प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारण्यास मदत होईल.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, “युवक हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना प्रत्यक्ष प्रशासनातील कार्यपद्धती समजावी आणि ते सक्षम नेतृत्व उभारू शकतील, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.