भाजप नेते तजिंसदर बग्गा (Tajinder Singh) यांनी उज्जैनमधील एका हिंदू मंदिराला भेट दिल्यानंतर डाव्या विचारसरणीच्या पत्रकार मृणाल पांडे यांनी त्यांची खल्ली उडवली आहे. पत्रकार मृणाल पांडे (Mrinal Pande) म्हणाल्या की, तुम्ही केवळ सनातन धर्माचे पालन करत आहात, सुवर्ण मंदिरातही डोके टेकवा, अशी गरळ पांडे यांनी ओकली.
( हेही वाचा : Parliament Winter Session : संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित; राहुल गांधींच्या गुंडगिरीमुळे भाजपा खासदार रुग्णालयात दाखल )
बिग बॉस फेम आणि भाजप नेता तजिंदर बग्गा हे हिंदू (Hindu) धर्मातील देवांचे देव महादेवाच्या मंदिरात गेल्याने त्यांची खिल्ली पत्रकार मृणाल पांडे यांनी उडवली. या वक्तव्यामुळे हिंदू (Hindu) धर्म आणि शीख धर्मात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पत्रकाराने केल्याचे बोलले जात आहे. पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असे वादग्रस्त विधान केले.
दरम्यान सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हिंदू देवातांप्रती श्रद्धा दर्शवणाऱ्या एका शीख धर्मीय असणाऱ्या नेत्याची विनाकारण खिल्ली उडवली जात असल्याचे बोलले जात आहे. अशातच हिंदू देवता आणि हिंदू (Hindu) धर्मशास्त्रात शिख धर्मासह इतर धर्मांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. बग्गा हे महादेवाच्या चरणी लीन होण्यासाठी गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरूनच आता त्यांना कोणतेही एक कारण नसताना घेरण्याचा प्रयत्न डाव्या विचारांच्या मंडळींकडून केला जात आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे बोलले जात आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community