काँग्रेसची पडझड, तरी राहुल गांधी नाईट लाईफमध्ये मश्गुल

113

सध्या राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची पडझड सुरु झाली आहे. काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. असा स्थितीत काँग्रेसच्या नेत्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. पक्षाला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र नाईट लाईफमध्ये मग्न आहेत. नेपाळमधील पबमध्ये राहुल गांधी दिसले. तसा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा चर्चेत आली आहे.

काँग्रेसची अस्तित्वाची लढाई 

सध्या काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका सहन करावा लागला होता. आता २०२४ ला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने आधीच यासाठी व्यूहरचना आखली आहे. दुसरीकडे विरोधक भाजपच्या विरोधात एकत्र येऊन भाजपच्या विरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याकरता बैठका झाल्या आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी तिसरी आघाडी उभी करण्याचा विचार मांडला आहे. परंतु त्याऐवजी काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएला अधिक सक्षम करण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यासाठी काँग्रेसकडे सगळ्यांच्या नजरा वळाल्या आहेत. असे असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र नाईट लाईफमध्ये मग्न झाल्याचे दिसत आहेत.

(हेही वाचा राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे, टिळकांनी खरेच शिवरायांची समाधी बांधली का?)

राहुल गांधी चिनी दूतावासासोबत 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे नाईट क्लबमध्ये आहेत. त्यांच्यासोबत नेपाळमधील चीनचे राजदूत हाओ यांकी दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करताना राहुल गांधी आता टार्गेट बनले आहेत. सध्या चीनसोबत भारताचे नाते हे अडचणीचे बनले आहेत. दोन्ही देशांतील सीमावादामुळे दोन्ही देशांमधील वातावरण तापलेले असताना राहुल गांधी मात्र चीनच्या नेपाळमधील महिला राजदूत हाओ यांकी यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामुळेही हा विषय चर्चेचा बनला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.