Congress देशात समाजविघातक कृत्य करण्याच्या तयारीत; पंतप्रधान मोदी यांचा गौप्यस्फोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. परंतु कर्नाटकातील काँग्रेस  सरकारने ओबीसींचे 27 टक्के आरक्षण मुसलमानांनाही दिले.

172
विरोधकांना प्रचार करण्यासाठी मुद्दे उरले नाही तर चुकीच्या पद्धतीने बदनामी करत आहेत. कधी माझे व्हिडिओ, कधी अमित शहा यांचा तर कधी भाजपा अध्यक्षांचा व्हिडिओमध्ये ऐआयचा वापर करून चुकीचा प्रचार केला जात आहे. परंतु असल्या फेक व्हिडिओ आले तर त्याला फॉरवर्ड करण्यापासून रोखा, पोलिसांना द्या, त्यावर कडक कारवाई केली जाईल. फेक व्हिडिओपासून समाजाला वाचवण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कॉँग्रेस देशात देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
साताऱ्यात पहिलेही भगवा फडकलेला आहे, तर पुढेही भगवा फडकणारच आहे. माझे सहकारी म्हणाले की, तुम्हाला येथे येण्याची गरज नाही. पण मी म्हणालो की, मला साताऱ्यातील लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. सातारा लोकसभेसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह (Congress) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
2013 मध्ये मला भाजपाने मला पीएम पदासाठी घोषित केले. तेव्हा मी प्रथम रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून प्रेरणा मिळाली. त्यामुळेच मी गेल्या दहा वर्षांपासून मी शिवरायांच्या विचारावर काम करत आहे. साताऱ्याची भूमी ही शौर्याची भूमी आहे. येथील भूमीतील युवक सैन्यदलात आहेत. आज भारतीय सैन्यदलातील हत्यारे हे मेड इन इंडियाचे आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ पासून काँग्रेसने सैन्यदलातील लोकांना दूर ठेवले आहे. काँग्रेस  (congress) खोटे बोलण्यात मास्टरी आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, आजही नौसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जात होते. पण नौदलाच्या झेंड्यावर इंग्रजांचा लोगो होता. पण तो लोगो मी हटवला व त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा उल्लेख केला. एवढंच नाही, महाराष्ट्रासह देशभरातील किल्ल्यांचे वर्ल्ड हेरिटेजवर आणण्याचे काम सुरू आहे.
भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नाकारते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. परंतु कर्नाटकातील काँग्रेस  (Congress) सरकारने काय केलं. जे ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यामध्ये एक फतवा काढून मुस्लिमांचा ओबीसीमध्ये समावेश केला. काँग्रेस असाच प्रकार देशात करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मी काँग्रेसवाल्यांना व इंडिया आघाडीवाल्यांना सांगू इच्छितो की, मी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत तुमचे धर्माच्या आधारावरील आरक्षणाचे धोरण येऊ देणार नाही, संविधान बदलण्याची तुमची रणनीती घडू देणार नाही, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.

370 हटवून आम्ही दलितांना आरक्षण दिले

बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समतेचा संदेश दिला आहे. सामाजिक न्यायाची शिकवण दिली. पण काँग्रेसच्या (Congress) काळात त्या विचारांना किंमत दिली गेली नाही. पण NDA सरकारच्या काळात आम्ही कलम 370 हटवलं, मग याचा अभिमान देशवासियांना आहे की नाही, असा सवाल मोदी यांनी केला. ते म्हणाले की, मी कलम 370 हटवले याचा मला अभिमान आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील लोक आनंदी झाले आहेत. आरक्षणाचे गीत गाणाऱ्यांना मी विचारतो की, देशातील गरीब, आदिवासी भावाला आरक्षण मिळत होते. मग काश्मीरमधील गरीब, आदिवासी व दलित बहिणा भावांना आरक्षणचा अधिकार का नव्हता. कारण काँग्रेसवाल्यांनी केवळ व्होट बँकेचे राजकारण केले. पण आम्ही कलम 370 हटवून आम्ही तेथील लोकांना आरक्षण मिळू लागले आहे, असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.