२४ वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष! निवडणुकीत खर्गे यांचा दणदणीत विजय

143

कॉंग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष झाला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. खर्गे यांनी शशी थरूर यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. शशी थरूर यांनी ट्वीट करत मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली तर थरूर यांना केवळ १ हजार ७२ मते मिळाली आहेत. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ९ हजार ३८५ जणांनी मतदान केले होते.

( हेही वाचा : Travel Now Pay Later : रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा!)

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास ९६ टक्के मतदान झाले होते. २४ अकबर रोड येथील कॉंग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्षपग सोडले होते. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेरची निवडणूक 2000 मध्ये पार पडली होती. सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत प्रसाद यांचा दारुण पराभव झाला होता. त्यापूर्वी 1997 मध्ये शरद पवार, सीताराम केसरी आणि राजेश पायलट यांच्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. सीताराम केसरी यांचा विजय झाला होता. शरद पवारांना पराभवाचा धक्का बसला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.