कर्नाटकाच्या विधानसभेत वीर सावरकरांचे तैलचित्र लावल्याने काँग्रेसला पोटशूळ!

141

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा होणारा सन्मान आजही काँग्रेससाठी पोटदुखी ठरत आहेत. त्याचा प्रत्यंतर पुन्हा एकदा आला आहे. कर्नाटक विधानसभेत वीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण केल्यावर काँग्रेसने आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी याच्या निषेधार्थ विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

कर्नाटक हिंदुत्वाचे केंद्रबिंदू! 

सध्या कर्नाटक हे प्रखर हिंदुत्वाचे केंद्रस्थान बनले आहे. या राज्यातून शाळा-महाविद्यालयांत मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून येण्यास विरोध करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होत आहे, असा सूर उत्पन्न झाला होता. आता कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनात हलाल विरोधात विधेयक मांडले जाणार आहे. देशात मुसलमानांची समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे जे कारस्थान सुरु आहे, त्याला यामधून छेद देण्याचा प्रयत्न होणार आहे. याच अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते वीर सावरकर यांचे कर्नाटक विधानसभेत तैलचित्र लावले. त्यामुळे आता काँग्रेसचा तिळपापड झाला आहे.

(हेही वाचा विश्वविजेता अर्जेंटिना आणि इतर संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला किती मिळणार Prize Money?)

काय आहे प्रकरण? 

कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात वीर सावरकरांचे तैलचित्र लावल्यामुळे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि इतर काँग्रेस आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख आणि आमदार डीके शिवकुमार यांनी वीर सावरकर यांचे विधानसभेच्या सभागृहात तैलचित्र लावण्यास विरोध करत सत्ताधारी भाजप सरकारला विधानसभेचे कामकाज चालू द्यायचे नाही, म्हणून त्यांनी हा खटाटोप केला आहे, असा आरोप केला. विरोधीपक्ष काँग्रेस हा सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उपस्थित करणार आहे. सरकारकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार केला आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. वीर सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते, मग त्यांचा आदर का केला जात आहे, असे म्हणत सावरकर द्वेष करण्याचा प्रयत्न केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.