काँग्रेसच्या ‘टूलकिट’वर शिक्कामोर्तब?

काँग्रेस आता या 'टूलकीट'प्रमाणे समाजात गैरसमज, भ्रम पसरवून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मोहीम राबवत आहे. येनकेन प्रकारेण पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता देशात आणि विदेशात कमी करण्याचे इस्पित सध्या करण्यासाठी काँग्रेस खोटारडेपणा करत आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी म्हणाले.  

सध्या काँग्रेस एका बाजूला त्यांच्या ‘टूलकिट’ला नाकारत असताना दुसरीकडे मात्र ‘टूलकिट’मध्ये सांगितल्याप्रमाणेच काँग्रेसचे कार्यकर्ते तंतोतंत वर्तन करत आहेत. कोरोना महामारीचा ‘हत्यार’ म्ह्णून वापर करणारी काँग्रेस सध्या या माध्यमातून देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचे कारस्थान रचत आहे. त्यासाठी विविध कल्पना राबवत आहे. एकाच वेळी देशातील विविध राज्यांमध्ये सध्या काँग्रेसने हा ‘धंदा’ सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने आता ‘मोदीजी, हमारे बच्चोंकी वैक्सीन विदेश क्यू भेज दी?’, अशी विचारणा करणारे फलक मुंबईत जागोजागी लावले आहेत.

सर्वकाही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटवण्यासाठी!

या ‘टूलकीट’मध्ये सांगितल्याप्रमाणे विदेशातील वर्तमानपत्रांमधून भारतातील स्मशानभूमीमध्ये जळत असलेल्या चितांचे फोटो ठसठशीत छापण्यात आले. अमेरिका, चीन येथील प्रमुख दैनिकांतून याला प्रसिद्धी देण्यात आली. देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकार अपयशी ठरत आहे, अशा आशयाच्या विविध पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल करून देशात आणि विदेशात भारताची पर्यायाने पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्यात आली. भारतातील कोरोना हा ‘इंडियन  स्ट्रेन’ म्ह्णून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणण्यात आला. आता काँग्रेसने बदनामीसाठी आणखी एक नवीन प्रकार शोधला का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

लसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी पोस्टरबाजी सुरु आहे, ती मुळात दिल्लीत सुरु झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा प्रकार सुरु केला आहे. त्यानंतर मुंबईत काँग्रेसवाल्यांनी हे उद्योग सुरु केले आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. वास्तविक हा देखील काँग्रेसच्या टूलकिटचाच भाग आहे, असे आमचे मत आहे. समाजात गैरसमज निर्माण करून भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. जिथे लहान मुलांसाठी अजून लस उपलब्ध नाही, त्या लसीच्या नावावरून खोटा प्रचार काँग्रेसवाले करत आहेत.
– माधव भांडारी, मुख्य प्रवक्ता, भाजप

‘टूलकिट’प्रमाणे सुरु आहे खोटा प्रचार!

त्यासाठी काँग्रेसने ‘मोदीजी, हमारे बच्चोकी वैक्सीन विदेश क्यू भेज दी? या आशयाचे फलक दिल्लीत लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता तेच फलक महाराष्ट्रात काँग्रेसने लावले आहेत. वास्तविक यामागे मोठा गैरसमज पसरवण्याचे कारस्थान आहे. कारण जो प्रश्न काँग्रेसने विचारला आहे, तोच बिनबुडाचा आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत बोलताना म्हणाले. ज्या लहान मुलांच्या लसीकरणाविषयी काँग्रेस विचारत आहे, ती लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधात्मक लस भारतातच काय जगात कुठल्याही देशाकडे नाही. त्यावर अमेरिकेत सध्या चाचणी सुरु आहे. भारतानेही अशा चाचणीला नुकतीच परवानगी दिली आहे. असे असताना काँग्रेस ‘मोदीजी, हमारे बच्चोकी वैक्सीन विदेश क्यू भेज दी? असे विचारात आहे, हा किती खोटा प्रचार सुरु आहे, हे दिसून येत आहे. जी लस अस्तित्वातच नाही ती पंतप्रधान मोदी विदेशात कुठून देणार? त्यामुळे काँग्रेस आता या ‘टूलकीट’प्रमाणे समाजात गैरसमज, भ्रम पसरवून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मोहीम राबवत आहे, हे स्पष्ट होते. येनकेन प्रकारेण पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता देशात आणि विदेशात कमी करण्याचे इस्पित सध्या करण्यासाठी काँग्रेस खोटारडेपणा करत आहे का, असेही माधव भांडारी म्हणाले.

(हेही वाचा : धक्कादायक! कोरोना बनले काँग्रेसचे ‘हत्यार’! मोदींच्या बदनामीसाठी ‘टूलकिट’!)

काय म्हटले आहे टूलकिटमध्ये? 

  • पंतप्रधान मोदी हे देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास कसे अपयशी ठरत आहेत, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरवण्यात यावेत.
  • कोरोनामुळे स्मशानभूमीत चिता जळत असल्याचे फोटो काढा आणि ते विदेशात पाठवा.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा ‘इंडियन स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हणून प्रसारित करा.
  • गृहमंत्री, विदेश मंत्री, अर्थ मंत्री हे कसे निष्क्रिय झाले आहेत, असे सांगत त्यांची बदनामी करा.
  • सोशल मीडियातून इंडियन युथ काँग्रेसच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना मदत करा.
  • जे कुणी सोशल मीडियातून मदत मागतील त्यांना तातडीने मदत करून सोशल मीडियातून त्याचे भांडवल करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here