लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा हिंदू म्हणून छळ करणारी प्राध्यापिका राहुल गांधींची निकटवर्ती

91

आॉक्सफॉर्ड विद्यापीठात हिंदूफोबियाची शिकार झालेल्या रश्मी सामंतनंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या करण कटारिया बरोबर धार्मिक भेदभाव झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे त्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थी निवडणुकीतून अपात्र ठरवण्यात आले. यामागे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची निकटवर्ती मुकुलिका बॅनर्जी यांचे नाव पुढे आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेल्या संबंधांमुळे करण कटारिया यांच्या विरोधात मुकुलिका बॅनर्जी यांनी बदनामी करणारी मोहीम चालवली होती. यामुळे करण यांना विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतून अपात्र केले आहे. बॅनर्जीचा हस्तक्षेप LSE  प्रशासनाच्या नजरेस आणले गेले आहे.

कोण आहेत मुकुलिका बॅनर्जी?

मुकुलिका बनर्जी या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि राज्यशास्त्र (LSE) मध्ये मानव विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये दक्षिण आशिया सेंटरच्या निर्देशिका आहेत. मुकुलिका बॅनर्जी दीर्घकाळापासून पश्चिमात्य देशांच्या माध्यमांमध्ये भारतविरोधी भूमिका मांडत आहेत.

फर्स्टपोस्ट सूत्रांच्या माहितीनुसार बनर्जी लंडनमध्ये शैक्षणिक व नैतिकतेच्या बाबतीत प्रभावशाली महिला आहेत. त्या डाव्या विचारसरणीचा व हिंदू विरोधी प्रपोगंडा प्रचार करतात. त्यांना आरएसएस, हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्या महिला म्हणून ओळखल जात. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी संडे टाईम्स साठी मोदी मुस्लिमांचा खुलेआम द्वेष करतात आणि भारताच्या संविधानाची चेष्टा करतात, असा लेखही लिहिला होता.

(हेही वाचा जॉन्सन अँड जॉन्सनची कॅन्सरला कारणीभूत ठरणारी उत्पादने झाली बंद; अमेरिकेत कंपनी देणार भरपाई; भारतात मात्र मौन)

मुकुलिका राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्येही सहभागी झालेल्या होत्या. याचबरोबर राहुल गांधीची लंडनमध्ये सगळी व्यवस्था केलेली. यात्रा संपल्यानंतर लंडन दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींच्या सगळ्या कार्यक्रमांची व्यवस्थाही केलेली. राहुल गांधींचा हाउस ऑफ कॉमन्स कार्यक्रम आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली. इथेच राहुल गांधींनी भारतीय लोकशाही धोक्यात आहे हे भाषण दिले आणि याला वाचवायला परदेशी मदत मागितलेली. याच्या अगोदरही खूप वेळा मुकुलिका बनर्जीने राहुल गांधींचे (LSE) दक्षिण आशिया सेंटरमध्ये संबोधित करण्यासाठी आपल्या कार्यालयाचा वापर करायला दिलेला आहे, ज्याच्या त्या निर्देशिका आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.