- प्रतिनिधी
महाविकास आघाडी मधील काही जागावर तिढा हा काही जागांवरचा नसून तर तो दीर्घकालीन राजकीय फायदा उचलण्यासाठी केला गेला असल्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. कारण जागावाटपाचा संबंध संख्याबळाशी आणि संख्याबळाचा संबंध थेट मुख्यमंत्री पदाच्या दाव्याशी आहे. (Congress)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : नाना पटोले मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतूनच बाहेर!)
आघाडीत ज्याचे संख्याबळ जास्त, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरले. असे असताना विदर्भात ६२ जागा वर काँग्रेसचे (Congress) प्राबल्य आहे. लोकसभेच्या निकालांकडे पाहता या प्राबलण्याचा फायदा विधानसभेसाठी होऊ शकतो. अशात कमी जागा लढवण्यास मिळाल्यास काँग्रेसचा क्लेम हा कुठेतरी कमी पडू शकतो. विदर्भात लोकसभा निवडणुकांच्या निकालांकडे पाहिल्यास विधानसभेला देखील काँग्रेस (Congress) नंबर एक वर राहू शकते. म्हणूनच विधानसभेच्या उमेदवारी वाटतानाच इतर दोन पक्ष आपली संख्या वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शिवसेना उबाठा गट हा पुढे जाऊन मुख्यमंत्री पदावर ती आपला दावा सांगता यावा म्हणूनच या जागा कमी करण्याचा आधीपासूनच तर प्रयत्न करत नाहीत ना ? यावर देखील काँग्रेस वरिष्ठांमध्ये चर्चा झाली आहे.
(हेही वाचा – झारखंडमधील जागावाटपावरुन I.N.D.I. Alliance मध्ये फूट; राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात)
सगळ्या राजकारणाची जाणीव काँग्रेस (Congress) नेत्यांना असल्यामुळे, किंबहुना असली राजकारण काँग्रेस नेते कोळून प्यायलामुळे त्या पक्षाच्या नेत्यांनी मुंबईतल्या वाटाघाटींमध्ये उबाठाला ताणून धरलेच, पण दिल्लीत जाऊनही त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे तोच आग्रह धरला. उबाठाला दिलेल्या ८ जागा पुरेशा आहेत. त्यांचा १२ जागा खेचून घेण्याचा आग्रह मान्य करण्यात काँग्रेसचा संख्याबळाचा तोटा आहे. त्यातून मुख्यमंत्रीपदावर देखील पाणी सोडावे लागू शकते, हे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी हायकमांडच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालविला आहे, जो काँग्रेसच्या (Congress) दृष्टीने राजकीय तर्कसंगत आहे. आता काँग्रेस हायकमांड या सर्व गोष्टींवर काय निर्णय घेतो हे पाहण्याजोगे आहे. जागावाटकांमध्ये विदर्भात माघार घेतल्यास मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी कुठेतरी कमी पडू शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community