MVA च्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस, उबाठा तोट्यात; तर पवार गट ना नफ्यात ना तोट्यात

125
MVA च्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस, उबाठा तोट्यात; तर पवार गट ना नफ्यात ना तोट्यात

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा (MVA) जागा वाटपाचा जो मुंबईतला फॉर्म्युला बनतो आहे, तो पाहता महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात ना तोट्यात!, अशी काहीशी अवस्था होऊन बसली आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान)

कसा आहे फॉर्म्युला

शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतल्या (MVA) घटक पक्षांनी ३-२-१ असा फॉर्म्युला स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. या फॉर्म्युलानुसार मुंबईतल्या ३६ जागांपैकी उबाठाच्या वाट्याला १५, काँग्रेसच्या वाट्याला १४ आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्यात. याचा अर्थच शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस तोट्यात गेल्यात, तर पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात ! अशी अवस्था आली आहे.

याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाबरोबरच्या युतीमध्ये शिवसेनेने ३६ पैकी १९ जागा लढविल्या होत्या, तर राष्ट्रवादी बरोबरच्या आघाडीत काँग्रेसने तब्बल २९ जागा लढवल्या होत्या आणि शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची फक्त ७ जागांवर बोळवण केली होती. यापैकी काँग्रेसने फक्त ४ जागा जिंकल्या आणि पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त १ जागा जिंकली होती. त्याउलट शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात मुंबईतल्या ३६ पैकी ३१ जागा पडल्या होत्या. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती प्रचंड बहुमताने सत्तेच्या दिशेने गेली होती.

(हेही वाचा – Vidhansabha Election 2024 : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवणार का?)

परंतु २०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रात फार मोठे राजकीय महाभारत घडले. महाविकास आघाडी (MVA) अस्तित्वात आली आणि २०२४ च्या जागा वाटपापर्यंत चर्चा येऊन ठेपली. पण या जागा वाटप असल्या फॉर्मुल्यामध्ये ३-२-१ नुसार उबाठाच्या वाट्याला १५ काँग्रेसच्या वाटेला १४ आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्याने ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात गेले. पवारांना ना फायदा झाला, ना तोटा झाला, अशा खोड्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष अडकले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.