- खास प्रतिनिधी
हरियाणा विधानसभा निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीत भांडणे वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणामध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, तर भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची तयारी केली. त्यामुळे काँग्रेसची महाराष्ट्रात बार्गेनिंग पॉवर कमी झाली असल्याने शिवसेना उबाठाने पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. (Congress-Shiv Sena UBT)
एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूने
हरियाणामध्ये जाट समाज नाराज, महिला कुस्तीपटूंचे आंदोलन, शेतकरीविरोध अशी परिस्थिती दिसत होती. तसेच बहुतांश एजन्सिजचे एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूने निकाल लागणार आणि काँग्रेस सरकार स्थापन होणार, या मतांवर आले होते. असे सगळे भाजपाविरोधी वातावरण असताना हरियाणा भाजपाने जिंकले आणि काँग्रेसची वाताहात झाली. (Congress-Shiv Sena UBT)
‘सामना’तून काँग्रेसला टोले
याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला असून काँग्रेसने हरियाणामध्ये अन्य पक्षांची आघाडी केली नाही, याचा मोठा फटका बसला, अशी आवई काँग्रेस मित्रपक्षांकडून विशेषतः शिवसेना ऊबाठाकडून उठवली जात आहे. उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी हरियाणा निकाल लागला त्यावर पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात एक अग्रलेख लिहून काँग्रेसला टोले लगावले. (Congress-Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi ची दुसरी उमेदवार यादी जाहीर)
काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे
“राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हरियाणातील निकालावरून काहीतरी शिकावे, असे बरेच काही आहे. हरियाणात काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले. या खेळात संपूर्ण राज्याच हातचे गेले. जम्मू काश्मीरमध्ये इंडी आघाडीचा विजय झाला. हरियाणात फक्त काँग्रेसची पिछेहाट झाली हे चित्र इंडी आघाडीसाठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार,” अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेना उबाठाने ‘सामाना’ च्या अग्रलेखातून केली. त्याचप्रमाणे “हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास आणि स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे वातावरण असताना जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडून शिकावे लागेल,’ असा टोमणाही या अग्रलेखात हाणण्यात आला आहे. (Congress-Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Mumbai Metro 3 तिसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवासी नाराज)
राऊत काय बोलतो त्यावर लक्ष देत नाही
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले. “संजय राऊत काय बोलतो काय लिहितो त्यावर आम्ही लक्ष देत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्र यातला फरक कोणाला काळात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. वेळ आल्यावर उत्तर देऊ,” असे पटोले म्हणाले. (Congress-Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community