Congress : महाराष्ट्रात कॉंग्रेसने २५ जागा लढवाव्या; राज्यांतील नेत्यांनी हायकमांडपुढे मांडली भूमिका

भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसह देशभरातील तमाम राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 'इंडी' आघाडीतील घटक पक्षांकडून भाजपविरोधात एकच संयुक्त उमेदवार उतरविला जाणार आहे.

198
Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसचा जागावाटप प्रस्तावावरून वाद वाढण्याची चिन्हे
Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसचा जागावाटप प्रस्तावावरून वाद वाढण्याची चिन्हे

लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने (Congress) महाराष्ट्रात किमान २५ जागा लढविल्या पाहिजे असे मत राज्यातील नेत्यांनी शुक्रवारी (२९ डिसेंबर) दिल्लीतील नेत्यांपुढे व्यक्त केले. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसह देशभरातील तमाम राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ‘इंडी’ आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांकडून भाजपविरोधात एकच संयुक्त उमेदवार उतरविला जाणार आहे. अशात, कॉंग्रेसने इंडी आघातील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांशी चर्चा करण्यापूर्वी राज्यातील कॉंग्रेसच्या (Congress) नेत्यांची भूमिका जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शुक्रवारी अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील समितीपुढे आपली भूमिका मांडली. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मोहन प्रकाश आदी नेते उपस्थित होते. (Congress)

दरम्यान, कॉंग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील २५ जागा लढवायला हव्यात अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी आजच्या बैठकीत मांडली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. काँग्रेसने (Congress) कोणकोणत्या जागा लढवायच्या, पक्ष कोठे मजबूत स्थितीत आहे. घटक पक्षांना किती जागा सोडायच्या, कोणत्या सोडायच्या या विषयावरही राज्यांतील नेत्यांनी आपले मत समितीपुढे मांडले असल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने सुध्दा तिन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त जागा आपलाच पक्ष लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस (Congress) पक्ष सुध्दा १५ जागा लढविण्याची तयारी करीत असल्याचे समजते. यानंतर अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील समिती शनिवारी किंवा रविवारी राज्यांतील नेत्यांच्या भूमिकेबाबतचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सोपविणार आहे. या रिपोर्टनंतर कॉंग्रेस पक्ष इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांसोबत जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू करणार आहे. (Congress)

(हेही वाचा – Air Pollution : हवेतील प्रदुषण ‘या’ तीन विभागांमध्ये अधिक, महापालिकेच्या रडारवर ‘हे’ तीन विभाग)

या बैठकीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि आपली भूमिका समितीपुढे मांडली आहे. मात्र, अद्याप कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. अंतिम निर्णय हायकमांडकडून घेतला जाणार आहे. उबाठा गट नेते संजय राऊत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर बोलणे पटोले (Nana Patole) यांनी टाळले. भारतीय जनता पक्षावर (Bharatiya Janata Party) हल्ला चढविताना पटोले (Nana Patole) म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी पक्षाला लोकशाही मान्य नाही आहे. म्हणूनच ते निवडणुका घेत नाही आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि हे भाजपचे (BJP) पाप आहे. भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे, असेही ते म्हणाले. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.