अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली असून, भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक असल्याचे सचिन सावंत म्हणालेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे.
बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन @MumbaiPolice ला बदनाम करण्याच प्रयत्न करणाऱ्या @BJP4Maharashtra च्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 7, 2020
काय म्हणाले सचिन सावंत
बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.
दरम्यान सुशांत सिंहची आत्महत्या नाही, हत्या आहे. अनेक तज्ज्ञ सांगताहेत, मी सुद्धा तेच म्हणतो. यात कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एफआयआर दाखल झालेला नाही. बिहारमध्ये झाली. १३ तारखेला पार्टी झाली. त्यात सुशांतसोबत कोण होतं. ८ तारखेला पार्टी झाली. दोन तास उशिरा आलेला आणि सुशांतला हॉस्पिटलमध्ये नेणारा माणूस कसा सांगू शकतो, लटकलेलं पाहिलं. दिनो मोरियाच्या घरी दररोज मंत्री येतात. तिथे काय चालतं. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे,” असं खासदार नारायण राणे म्हणाले म्हणाले होते.