काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील जागावाटपाबाबत नवा वाद समोर येत आहे. आता जे झाले ते झाले, उमेदवारी जाहीर झाली आहे. मविआत पुढची जागावाटपाची चर्चा २०२९ ला होईल. असे ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. यावर नाना पटोलेंनी आता प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेवर चर्चा थांबली होती, काल बैठक झाली आहे’, असं पटोले म्हणाले. यावरून मविआतील जागावाटपाबाबत नवा वाद समोर आला आहे. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Congress आपचा हिशेब चुकविण्याच्या मूडमध्ये; रॅलीतील Arvind Kejriwal यांच्या होर्डिंगवरून असंतोष)
नाना पटोले म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देणार का, या प्रश्नावर आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. तसेच त्यांना द्यायचे असेल, तर ते देऊ शकतात. समर्थन द्यायचेच आहे, तर सगळ्याच जागांवर द्यावे. ठराविक नाही. रश्मी बर्वे हा विषय संपला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, ते निवडून येतील. मी पण वंचित आहे. शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मला व्यक्तिगत टॅार्चर केले जात आहे. हे काही बरोबर नाही. त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ.” असा इशाराच पटोलेंनी दिला आहे. (Uddhav Thackeray)
नेमकं काय म्हणाले होते ठाकरे?
राहुल गांधी किंवा खर्गे यांच्याशी चर्चा करण्याची गरज नाही. आघाडी-युतीमध्ये शेवटपर्यंत जागावाटपावरून दावे- प्रतिदावे सुरू राहतात. जागावाटपाबाबत जे काही व्हायचे ते होऊन गेले. आता यामध्ये काहीही उरलेले नाही. आता आघाडीमध्ये जागावाटपाची जी चर्चा होईल, ती २०२९ ला होणार. आता उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला ही समजले आहे”, असे ठाकरे म्हणाले होते. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community