अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; नाना पटोले यांची घोषणा

113

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली.

( हेही वाचा : भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवादी ठार )

नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या आघाडीचे सरकार होते. या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले.

महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत; म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून, शिवसेना जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असे पटोले म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.